कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
आज डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा स्मृतिदिन. फक्त एक राजकीय नेता म्हणून नाही, तर विकासदृष्टी असलेला एक दूरद्रष्ट तत्त्वज्ञ, मराठवाड्याच्या मातीतून उगम पावलेला एक तेजस्वी विचारवंत, आणि हजारो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरलेला ‘कर्मयोगी’… अशी त्यांची ओळख होती. राजकारणात असताना त्यांनी कित्येकांमध्ये नेतृत्व निर्माण केलं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी संवेदनशीलता जपली.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सिंचन, सहकार, आणि शिक्षण या तीन स्तंभांवर ग्रामीण विकासाचा पाया रचला. मंजरा, तेरणा, नागझरी सारख्या पाणी प्रकल्पांपासून ते निलंगा साखर कारखान्यापर्यंत, आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून लातूरच्या शिक्षण क्रांतीपर्यंत त्यांची ठसा उमटवणारी कामगिरी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात ‘कर्मयोग्याचं’ उदाहरण म्हणून उभी आहे.
जलसिंचनाचा ‘पायवाट’वाला पायोनियर
कोरडवाहू लातूर जिल्ह्यात पाणी म्हणजे सजीवतेचा श्वास. या भागात पाण्याचे एक एक थेंब महत्त्वाचा आहे. डॉ. निलंगेकरांनी हे फार पूर्वी ओळखलं. त्यांच्या काळात राबवलेले विविध जलसिंचन प्रकल्प, बंधारे, कालवे आजही अनेक गावांचे जीवनमान उंचावतात. त्यांनी जलसिंचनाला राजकारणाचे साधन न बनवता, जनतेच्या कल्याणाचे साधन बनवले.
डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांची ठळक कामगिरी
१. जलसिंचनाच्या माध्यमातून मराठवाड्याला चालना
-
लातूर, उस्मानाबाद, बीड आणि परभणीसारख्या कोरडवाहू भागात सिंचन योजनांची उभारणी.
-
मांजरा प्रकल्प, तेरणा धरण, नागझरी प्रकल्प यांसारख्या पाणी प्रकल्पांना सक्रिय पाठबळ.
-
अनेक लघु सिंचन योजना व बंधारे यामुळे हजारो एकर शेतीला पाणी उपलब्ध झालं.
२. शिक्षण संस्थांची स्थापना
-
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना.
-
लातूर पॅटर्नच्या प्रारंभी टाकलेली पायाभरणी.
-
लातूरमध्ये अनेक महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आणि तंत्रनिकेतनांची सुरुवात.
३. सहकार क्षेत्रातील योगदान
-
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकारी साखर कारखाने उभारले.
-
सहकारी बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली.
-
निलंगा साखर कारखाना ही त्यांची दूरदृष्टी दाखवणारी यशस्वी सहकारी चळवळ.
४. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (१९८५-१९८६)
-
अल्पकालीन कार्यकाळ असूनही विकासाभिमुख धोरणं राबवली.
-
प्रशासकीय शिस्त, निधीचे काटेकोर नियोजन, आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित.
५. कार्यक्षम प्रशासक आणि विधायक विधायक
-
विधानसभा व संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग.
-
काटेकोर नियोजन, स्पष्ट धोरण, आणि निर्णयक्षम नेतृत्व हाच त्यांचा आधार होता.
——————————————————————————————————–
Be the first to write a review