सह्याद्रीच्या कुशीत धावणार ‘जॉय मिनी ट्रेन’

माथेरान-दर्जिलिंगची मजा आता कोयनेत

0
64
The 'Joy Mini Train' will soon be running near the blue reservoir of Koyna Dam.
Google search engine
सातारा : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
माथेरान, दार्जिलिंग आणि सिमल्यातील प्रसिद्ध हिल रेल्वेचा थरार आता सह्याद्रीच्या कुशीत अनुभवता येणार आहे. कोयनानगरच्या निसर्गरम्य परिसरात एक नवी स्वप्नवत सफर आकाराला येत असून, कोयना धरणाच्या निळ्याशार जलाशयाजवळ ‘जॉय मिनी ट्रेन’ लवकरच धावणार आहे.
अनेक वर्षांपासून थांबलेली कोयना पर्यटनाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या संकल्पनेतून हा रोमांचक प्रकल्प प्रत्यक्षात उतरणार असून प्रस्ताव, परवानग्या आणि आर्थिक आराखड्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मिनी ट्रेन – एक अविस्मरणीय अनुभव

कोयनानगरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मिनी ट्रेन केवळ प्रवास नसून एक भावनिक सफर ठरणार आहे. मॉडेल रूमपासून नेहरू उद्यानापर्यंतचा सुमारे काही किलोमीटरचा हा प्रवास डोंगरदऱ्यांमधून नागमोडी वळणे घेत, ढगांना स्पर्श करत, कोयना धरणाच्या जलाशयाच्या काठाने पुढे सरकेल. प्रवासादरम्यान पक्ष्यांचा किलबिलाट, दाट जंगलांचे मनोहारी दृश्य आणि सह्याद्रीच्या हिरवाईचा थरारक अनुभव प्रत्येक वळणावर नवे रंग उलगडेल.

स्थानिकांसाठी विकासाचे नवे दरवाजे

या प्रकल्पामुळे कोयना पर्यटनाला नवी झेप मिळण्यासोबतच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही खुल्या होणार आहेत. मिनी ट्रेनमुळे वाढणाऱ्या पर्यटकांमुळे होम-स्टे सुविधा, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकला विक्री, तसेच स्थानिक गाईड सेवांना मोठी चालना मिळेल. परिणामी स्थानिक अर्थव्यवस्थेत नवचैतन्य येईल.

या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर कोयनानगर देशाच्या तसेच जगाच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे स्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. सह्याद्रीच्या कुशीत, कोयना धरणाच्या निसर्गरम्य परिसरात ‘जॉय मिनी ट्रेन’चा हा जादुई प्रवास महाराष्ट्रातील पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेल, यात शंका नाही.
————————————————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here