जो रुटचा ऐतिहासिक पराक्रम

टेस्ट क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर झेप

0
83
Google search engine

प्रसारमाध्यम : स्पोर्टस डेस्क

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडचा अनुभवी बॅटर जो रुटने एक मोठा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सध्या सुरु असलेल्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रुटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३,२९० धावा पूर्ण करत, टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे.
या कामगिरी दरम्यान रुटने भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड ( १३,२८८ धावा ) आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू दिग्गज जॅक कॅलिस ( १३,२८९ धावा ) यांना मागे टाकले. रुटच्या नावावर आता १३,२९० धावा जमा असून, तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या ( १३,३७८ धावा) रेकॉर्डच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
विशेष म्हणजे, जर जो रुटने सध्याच्या इनिंगमध्ये आणखी १२० धावा केल्या, तर तो रिकी पॉन्टिंगलाही मागे टाकेल आणि तो टेस्ट क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचेल.
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ फलंदाज ( जुलै २०२५ पर्यंत ) 
१) सचिन तेंडुलकर ( भारत ) – १५,९२१ धावा
२) रिकी पॉन्टिंग ( ऑस्ट्रेलिया ) –  १३,३७८ धावा
३) जो रुट  (इंग्लंड ) –  १३,२९०* धावा
४) जॅक कॅलिस ( दक्षिण आफ्रिका ) –१३,२८९  धावा
५) राहुल द्रविड ( भारत ) – १३,२८८ धावा
जो रुटचा हा पराक्रम इंग्लंड क्रिकेटसाठी अभिमानास्पद ठरला असून, त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीमुळे तो आज जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार तंत्र, संयम आणि क्लासिक शैलीने रुटने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, त्या रुटच्या पुढील डावावर तो रिकी पॉन्टिंगला मागे टाकतो का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे !

—————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here