कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने घेतलेल्या (IIT) संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल (JEE Advanced 2025 exam result) जाहीर झाला आहे. रजित गुप्ता देशात पहिला आला. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील. गुणपत्रिका, पात्रता स्थिती आणि कटऑफ स्कोअर वेबसाइटवर उपलब्ध आहेत. यशस्वी विद्यार्थी जोसा (JoSAA, Joint Seat Allocation Authority) द्वारे जेईई एडवांस्ड काउंसलिंग २०२५ साठी नोंदणी करू शकतील, ज्याची प्रक्रिया ३ जूनपासून सुरू होईल.
जेईई एडवांस्ड परीक्षेचा निकाल आयआयटी कानपूरने जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांचे गुण अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर तपासू शकतात. ही परीक्षा १८ मे रोजी दोन सत्रांमध्ये घेण्यात आली. पेपर १ आणि पेपर २ अशा दोन भागांमध्ये ही परीक्षा झाली.
ठळक मुद्दे
- या परीक्षेच्या निकालात ५४३७८ उमेदवार पात्र ठरले, ज्यात ९४०४ महिला उमेदवारांचा समावेश आहे.
- १.८ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षेला दिली होती.
- १८ मे रोजी २३० शहरांमधील ७१२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
- या वर्षीची परीक्षा आयआयटी कानपूरने घेतली.
महत्त्वाच्या तारखा अशा
मॉक सीट वाटप 1: 9 जून
मॉक सीट वाटप 2: 11 जून
अंतिम निवड लॉकिंग: 12 जून
फेरी 1 वाटप: 14 जून
फेरी 2 वाटप: 21 जून
फेरी 3 वाटप: 28 जून
चौथी फेरी वाटप: ४ जुलै
फेरी 5 वाटप: 10 जुलै
IIT/NIT+ साठी अंतिम फेरी: १६ जुलै



