नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहिती नुसार, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे नाव एनडीए कडून उपराष्ट्रपती पदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
एनडीएच्या आघाडीतील बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते. नड्डा यांचा राजकीय अनुभव, संघटनात्मक कौशल्य आणि केंद्र सरकारशी असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार करून हे उमेदवारीचं नाव निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वीही उपराष्ट्रपतीपदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती, मात्र अंतिमतः एनडीएने नड्डा यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची उमेदवारी निश्चित केली आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी :
जेपी नड्डा हे भाजपचे जुने आणि अनुभवी नेते असून त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रिपदासह अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पक्षसंघटनेच्या पातळीवर त्यांनी अनेक राज्यांत प्रभावी कामगिरी बजावली आहे. उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यास, संसदेत उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
——————————————————————————————-



