कुरुंदवाड : प्रसारमाध्यम न्यूज
शिरोळ तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस गायब झालेला पाऊस अखेर गुरुवारी मनसोक्त बरसला.
तब्बल १५ दिवसानतंर गुरुवारी दुपारी तीन नंतर विजांच्या कडकडाटांसह शिरोळ तालुक्यात पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या.
गुरुवारी दुपारी तीन नंतर सुरू झालेला पाऊस सायंकाळी सहापर्यंत चांगला बरसला. या नंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. यामुळे सखल भागांसह शेत शिवारांतील सरीतून पाणी साचून राहिले.
आज झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने गेल्या पंधरा दिवसापासून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. तसेच आज बरसलेला पाऊस सर्वच पिकांना लाभदायक असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
——————————————————————————————-



