जर्मनी : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीवर विश्वास ठेवत, आपल्या प्रिय व्यक्तींना मृत्यूनंतरही पुन्हा पाहण्याची आशा अनेकजण बाळगत आहेत. हीच संकल्पना हक्काने प्रत्यक्षात आणण्याचा दावा केला आहे. जर्मनीतील Tomorrow Bio या कंपनीने, ज्यांनी एक अनोखी आणि वादग्रस्त सेवा क्रायोप्रिझर्वेशन (Cryopreservation) सुरू केली आहे.
काय आहे क्रायोप्रिझर्वेशन ?
क्रायोप्रिझर्वेशन ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये शरीरातील पेशी व ऊती (-196°C) इतक्या अत्यल्प तापमानावर लिक्विड नायट्रोजनद्वारे गोठवून जिवंत स्वरूपात संरक्षित केल्या जातात. कायदेशीर मृत्यू झाल्यानंतर अगदी काही मिनिटांतच ही प्रक्रिया सुरू केली गेली पाहिजे, अन्यथा शरीरातील पेशींना अप irreparable damage होते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
मोठा खर्च, अनिश्चित भविष्य
Tomorrow Bio या युरोपमधील पहिल्या क्रायोनिक्स लॅबने 2 मिलियन युरो (जवळपास 2 कोटी रुपये) एवढं शुल्क आकारून ही सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत 3-4 मृत व्यक्ती आणि 5 पाळीव प्राणी या प्रक्रियेद्वारे गोठवण्यात आले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, 650 हून अधिक लोकांनी यासाठी आधीच नोंदणी केली आहे, कारण त्यांना वाटतं की विज्ञान एक दिवस मृत्यूलाही हरवेल.
गुंतवणूक की विज्ञानावरचा सट्टा ?
सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक लोक या संकल्पनेला “शाश्वत जीवन” मिळवण्याची संधी मानत आहेत. मात्र या प्रक्रियेमागे कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही की गोठवलेले शरीर किंवा मेंदू कधी पुनरुज्जीवित करता येईल.
क्लाईव्ह कोएन, किंग्ज कॉलेज लंडनचे न्यूरोसायन्सचे प्राध्यापक, म्हणतात की , “माणसाचा मेंदू आणि स्मृतीसाठी असणारी जटिल रचना आजच्या तंत्रज्ञानाने जिवंत ठेवता येत नाही. ही संकल्पना हास्यास्पद आणि भावनिक पातळीवर खेळणारी आहे.”
नैतिक आणि वैज्ञानिक वाद
ही सेवा आता नैतिकतेचा आणि विज्ञानाच्या मर्यादांचा प्रश्न निर्माण करत आहे. मृत्यू नंतरचे जीवन ही संकल्पना आध्यात्मिक होती, ती आता तंत्रज्ञानावर आधारलेली होऊ पाहत आहे. मात्र, यामागे लाखो रुपयांचा खर्च असून यशस्वितेची कोणतीही हमी नाही.
मृत्यूला झुंज देण्याचा प्रयत्न. ही संकल्पना जितकी रोमांचक वाटते, तितकीच ती अनिश्चित आणि वादग्रस्त आहे. काही लोकांसाठी ही एक नवीन आशा असेल, तर काहींसाठी ही केवळ भावनांची आणि पैशांची शोषण व्यवस्था. पण प्रश्न अजूनही तसाच आहे: विज्ञानाने मृत्यूवर विजय मिळवला, असं कधी म्हणता येईल का ? की ही केवळ मानवाच्या अमरतेच्या अतिमहत्त्वाकांक्षेची एक महागडी भ्रांत आहे ?
—————————————————————————————–



