इस्लामपूरचं नाव ‘ईश्वरपूर’ : राज्य सरकारचा निर्णय

केंद्राकडे प्रस्ताव

0
116
Minister Chhagan Bhujbal gave information about this on the last day of the legislative session.
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

राज्य सरकारनं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला असून, आता या शहराचं नविन नाव ईश्वरपूर असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी याबाबत माहिती दिली.
भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, “सरकारनं ईश्वरपूर हे नाव निश्चित केलं असून त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.”
स्थानिक नागरिक गेल्या काही वर्षांपासून इस्लामपूरचं नाव बदलण्याची मागणी करत होते. या मागणीकडे सकारात्मक प्रतिसाद देत सरकारनं अखेर हा निर्णय घेतला आहे.
मागील नावबदलांची पार्श्वभूमी
राज्यात याआधीही काही शहरांची नावे बदलण्यात आली आहेत:
  • औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर
  • उस्मानाबादचं नाव धाराशिव
  • अहमदनगरचं नाव अहिल्यानगर
राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता इस्लामपूरचे नावही अधिकृतरित्या बदलून ‘ईश्वरपूर’ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर नवीन नावाचा वापर सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये करण्यात येईल.

————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here