अहमदाबाद : प्रसारमाध्यम न्यूज
आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात सायंकाळी रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी ही ऐतिहासिक संधी आहे . कारण ,कोणताही संघ अद्यापपर्यंत आयपीएल विजेता ठरलेला नाही. मात्र, या बहुप्रतिक्षित सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची चिंता वाढली आहे की, सामना पूर्ण होईल की नाही?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहमदाबादमध्ये हलक्याशा सरी पडू शकतात. संध्याकाळी ४ ते ७ वाजेदरम्यान पावसाची शक्यता पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
बीसीसीआयने अशा परिस्थितीसाठी काही नियम निश्चित केले आहेत :
- सामना पूर्ण करण्यासाठी १२० मिनिटांची अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे.
- पावसामुळे सामना पूर्ण न झाल्यास रिझर्व्ह डे म्हणजेच उद्या, ४ जूनला सामना खेळवला जाईल
- जर रिझर्व्ह डेवरही सामना होऊ शकला नाही, तर लीग टप्प्यात अधिक गुण आणि चांगल्या नेट रनरेट असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात येईल.
- या परिस्थितीत PBKS चा नेट रनरेट RCB पेक्षा अधिक असल्यामुळे सामना पूर्ण न झाल्यास पंजाब किंग्जला विजेता घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
आजचा सामना केवळ मैदानावरच नव्हे, तर हवामानाच्या मनःस्थितीवरही अवलंबून आहे. संपूर्ण देशाच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या आहेत. कारण दोघांपैकी एक संघ आज प्रथमच IPL ट्रॉफी उंचावणार आहे. पावसाने खोडा घातला, तरी नियमानुसार विजेता ठरवण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे. आता सर्वांच्या नजरा आहेत, आकाश किती साथ देतं आणि क्रिकेटचा राजा कोण बनतो याकडे !
—————————————————————————————-