आयपीएल – २०२५ स्थगित : बीसीसीआय चा मोठा निर्णय

0
131
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असून सुरक्षिततेचा विचार करता बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे पुढील सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडू आणि प्रेक्षकांची सुरक्षा पाहता बीसीसीआयकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

 

काल गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या धर्मशाला स्टेडियममध्ये पंजाब आणि दिल्ली यांच्या सुरु असलेला सामना रद्द करण्यात आला होता. १०.१ षटकांचा खेळ झाला असताना हा सामना रद्द करण्यात आला होता. मात्र, सुरक्षिततेचा विचार करता बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे पुढील सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर ड्रोन हल्ले केले जात आहेत. येत्या काही दिवसात भारत पाकिस्तानमधील संघर्ष वाढण्याची भीती आहे.अद्यापही आयपीएलचे १५ सामने शिल्लक आहेत. हे सामने कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. 

——————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here