spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

HomeUncategorizedचीनला मागे टाकत, भारत बनला  iPhone हब !

चीनला मागे टाकत, भारत बनला  iPhone हब !

 कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

२० टक्के उत्पादन आता भारतात

अॅपल कंपनी आता जगभरात विकणाऱ्या दर ५ आयफोन पैकी १ आयफोनची भारतात निर्मिती करीत आहे. म्हणजे आयफोनचे २० टक्के उत्पादन आता भारतात होत आहे. सरकार देखील ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात या फोनची मॅन्युफॅक्चरिंग वाढवत आहे.

चीन नव्हे भारत बनला हब

Apple आणि त्याचे पुरवठादार फॉक्सकॉन, विस्ट्रॉन (आता टाटाकडे ) आणि पेगाट्रॉन हे सर्वच जण आता चीनऐवजी भारतात आयफोनची मॅन्युफॅक्चरिंग करण्यात रस घेत आहेत. त्यामुळे आयफोनचे प्रोडक्शन वेगाने होत आहे. कोविड-१९ मध्ये लॉकडाऊनमुळे Apple च्या सर्वात मोठ्या फॅक्टरीला फटका बसला होता.

भारतात कोठे iPhone तयार होतो ?

भारतात iPhone सर्वाधिक असेंबलिंग दक्षिण भारतातील फॉक्सकॉनच्या फॅक्टरीत होत असते. त्याशिवाय विस्ट्रॉनचा भारतातील बिझनेस ताब्यात घेणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आयफोनची असेब्लिंग होत आहे. त्यामुळे भारतातील आयफोनच्या निर्मितीचे प्रमाण वाढत चालले आहे.

निर्यातीचा आधार

आता भारतातील आयफोन मॅन्युफॅक्चरिंग केवळ घरगुती मार्केटपर्यंत मर्यादित राहीलेले नाही. आता हे डिव्हाईसेस जगभरात खासकरुन अमेरिकेत वेगाने पोहचत आहेत. ८ एप्रिल रोजी देशाचे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की मार्च २०२५ पर्यंत एप्पलने भारतात सुमारे १.५ ट्रिलियन रुपयांचे iPhones निर्यात केले आहेत.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments