कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ( इपीएफओ ) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी जाहीर करण्यात आलेले ८.२५ टक्के व्याज सदस्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं आहे. सध्याच्या घडामोडीनुसार, जवळपास ९७ टक्के खातेधारकांच्या खात्यात ही व्याजाची रक्कम जमा झालेली आहे.
केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित खातेधारकांच्या खात्यांवरही येत्या आठवड्याअखेरीस ही व्याजाची रक्कम जमा करण्यात येईल. त्यामुळे अजून ज्यांच्या खात्यात ही रक्कम आली नाही, त्यांना लवकरच ती प्राप्त होण्याची शक्यता आहे.
ईपीएफओ कडून दरवर्षी खातेधारकांच्या ठेवींवर व्याज देण्यात येतं. यंदा घोषित केलेले ८.२५ टक्के व्याज हे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक असून, त्यामुळे इपीएफ खातेदारांमध्ये समाधानाची भावना आहे.
मांडविय यांच्या माहितीनुसार या प्रक्रियेमध्ये १३.८८ लाख संस्थांमधील ३३.५६ कोटी सदस्यांची खाती या प्रक्रियेत अपडेट केली जाणं अपेक्षित होतं. ज्याअंतर्गत आता ८ जुलैपर्यंत १३.८६ लाख संस्थांच्या ३२.३९ कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
——————————————————————————————



