एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

0
272
Under the Integrated Horticulture Development Mission, the components of flower and spice cultivation and revitalization of old orchards are being implemented.
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याकरिता २२३.०८ लाख इतका निधी मंजूर असून क्षेत्र विस्तार कार्यक्रम घटकांतर्गत एकूण रु. १५.६६ लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळ पिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळ पिकांच्या जुन्या फळ बागांचे पुनरुज्जीवन करणे तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे या बाबींचा समावेश आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळ बागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे.

  • फुले लागवड – कट फ़्लॉवर्स- (गुलाब, ऍ़स्टर, बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनियास, गोल्डनरॉड, शेवंती इ.), खर्चमर्यादा – रु.१ लाख २५ हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड – एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.५० हजार प्रतिहेक्टर
  • कंदवर्गीय फुले- (निशिगंध, ग्लॅडीओलस, लिलिज, लिलियम, कॅलालिली, डेलिया इ.)- खर्चमर्यादा – रु. २ लाख ५० हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. 1 लाख प्रतिहेक्टर
  • सुटी फुले- (झेंडू, ऍ़स्टर, गॅलार्डिया, हेलिक्रायसम, शेवंती, मॊगरा, जाई, जुई, झिनिया, बिजली इ.)- खर्चमर्यादा – रु. ५० हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात,कमाल रु. २० हजार प्रतिहेक्टर
  • मसाला पिक लागवड- बियावर्गीय एव कंदवर्गिय मसाला पिके (मिरची, हळद व आले)- खर्चमर्यादा – रुपये ५० हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.२० हजार प्रतिहेक्टर
  • बहुवर्षिय मसाला पिके –  (काळीमिरी, कोकम इ.) – खर्चमर्यादा – रु. १ लाख प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० याप्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. ४० हजार प्रतिहेक्टर
  • विदेशी फळ पिक लागवड- ड्रॅगनफ्रुट- खर्चमर्यादा – रु.६ लाख ७५ हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकूण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. २ लाख ७० हजार प्रतिहेक्टर
  • स्ट्रॉबेरी- खर्च मर्यादा – रु.२ लाख प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.८० हजार प्रतिहेक्टर
  • अवॅकॅडो- खर्चमर्यादा – रु. १ लाख २५ हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या ४० टक्के ६०:४० या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.५० हजार प्रतिहेक्टर

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन-

  • जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन- खर्चमर्यादा – रु. ६० हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- खर्चाच्या ४० टक्के व जास्तीत-जास्त रू. २४ हेक्टर प्रतिहेक्टर
  • अळिंबी उत्पादन प्रकल्प- खर्चमर्यादा – रु.३० लाख प्रतियुनिट, आर्थिक मापदंड- खर्चाच्या ४० टक्के व जास्तीत-जास्त रू.१२ लाख प्रतियुनिट
  • बटन अळिंबी उत्पादनासाठी कंपोस्ट प्रकल्प- खर्चमर्यादा – रु.३० लाख प्रतियुनिट, आर्थिक मापदंड- खर्चाच्या ४० टक्के व जास्तीत-जास्त रू.१२ लाख प्रतियुनिट
  • कमी खर्चाचे अळिंबी उत्पादन केंद्र- खर्चमर्यादा – रु. २ लाख प्रतियुनिट, आर्थिक मापदंड- खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत-जास्त रू.१ लाख प्रतियुनिट

योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.

——————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here