spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeक्रिडाभारतीय टेनिसचा प्रेरणास्त्रोत : लिएंडर पेस

भारतीय टेनिसचा प्रेरणास्त्रोत : लिएंडर पेस

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क 

लिएंडर पेस (Leander Paes). हे भारताचे प्रसिद्ध टेनिसपटू. त्यांनी  १९९६ साली अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्य  पदक जिंकले. या कामगिरीने भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर ओळख मिळाली आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणाही मिळाली. त्यांच्या खेळातील सातत्य, समर्पण, आणि देशाभिमानामुळे ते आजही भारतीय क्रीडाजगतात आदरणीय व्यक्तीमत्व आहेत. त्यांचा आज जन्मदिवस, यानिमित्त ….

लिएंडर एड्रियन पेस यांचा जन्म १७ जून १९७३ साली कोलकाता- पश्चिम बंगाल येथे झाला. पेस यांचे टेनिसमधील प्रशिक्षण ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमी (चेन्नई) येथे झाले. त्यांनी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला एकेरी प्रकारातही चांगली कामगिरी केली.

लिएंडर पेस डावखुऱ्या हाताने खेळत असताना विशेषतः डबल्स आणि मिक्स्ड डबल्स प्रकारांमध्ये मोठे यश मिळवले आहे.  १९९० च्या उत्तरार्धात लिएंडर पेस आणि महेश भूपती ही जोडी अतिशय लोकप्रिय झाली. त्यांना “इंडियन  एक्सप्रेस” म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९९ मध्ये ते दोघे मिळून चारही ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचले आणि दोन जिंकले. लिएंडर पेस यांनी सात ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९९२ ते २०१६) भारताचे प्रतिनिधित्व केले. डेव्हिस कपमध्ये त्यांनी अनेक वर्षे भारतासाठी खेळले आणि सर्वाधिक विजय मिळवले.

लिएंडर पेस यांना मुख्यतः डबल्स आणि मिक्स्ड डबल्समध्ये जागतिक यश लाभले:

ग्रँड स्लॅम विजेतेपदे (एकूण १८) :
प्रकार विजयसंख्या उल्लेखनीय जोडीदार
मेंस डबल्स महेश भूपती, मार्टिना हिंगिस, लुकास ड्लोही
मिक्स्ड डबल्स १० मार्टिना नवरातिलोवा, मार्टिना हिंगिस, कारा ब्लॅक

काही महत्त्वाचे ग्रँड स्लॅम विजय :

  • विंबल्डन (मेन डबल): १९९९ (महेश भूपतीसह)

  • युएस (मिक्स्ड डबल): २००८, २०१५ ऑस्ट्रे़लियन ओपन (मिक्स्ड डबल): २००३, २०१०, २०१५

लिएंडर पेस यांनी १९९६ च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक जिंकले, हा भारतीय टेनिसच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. त्यांनी ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीचा ३-६, ६-२, ६-४ असा पराभव करून कांस्य पदक मिळवले. या सामन्यात पेस यांनी मानसिक दृढता आणि शारीरिक अडचणींवर मात करून विजय मिळवला.

या सामन्याच्या सुरुवातीला पेस पहिला सेट गमावले होते आणि दुसऱ्या सेटमध्ये १-२ आणि ३०-४० अशा स्थितीत होते. परंतु, त्यानंतर त्यांनी “द झोन” या मानसिक स्थितीत प्रवेश केला, ज्यामुळे त्यांनी खेळातील सर्व अडचणींवर मात केली. या मानसिक स्थितीमुळेच त्यांनी मेलिजेनीला पराभूत करून कांस्य पदक मिळवले.

या विजयामुळे पेस हे टेनिसमध्ये ऑलिंपिक पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले. त्यांचा हा विजय भारतीय क्रीडा जगतातील एक ऐतिहासिक क्षण मानला जातो.लिएंडर पेसने वैयक्तिक सामर्थ्यावर हे यश मिळवलं. तो एकटा खेळाडू होता आणि त्याने अनेक अव्वल खेळाडूंना हरवलं. त्यांच्या खेळातील चपळ हालचाल, नेटजवळ उत्कृष्ट नियंत्रण, आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी ही त्यांच्या खेळाची वैशिष्ट्ये आहेत.

 पुरस्कार व सन्मान :

अर्जुन पुरस्कार (१९९०), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (१९९६-९७), पद्मश्री (२००१), पद्मभूषण (२०१४)

लिएंडर पेस हे भारताचे महान टेनिसपटूंपैकी एक मानले जातात. त्यांच्या जिद्दी, चपळाई आणि देशप्रेमामुळे त्यांनी लाखो भारतीयांच्या मनात स्थान निर्माण केले. ते आजही भारतीय टेनिसच्या इतिहासातील एक तेजस्वी तारा म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०२१-२०२२ दरम्यान टेनिसमधून अधिकृत निवृत्ती घेतली.

——————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments