कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
स्पेस एक्सचे फाल्कन ९ रॉकेटने चार अंतराळवीरांना घेऊन फ्लोरिडातील केनेडी अवकाश केंद्रातून २५ जूनला अवकाशात उड्डाण केले. या मोहिमेत भारतातून शूभांशु शुक्ला, पोलंडचे स्वावॉश उझनान्स्की‑विश्नेव्ह्स्की, हंगेरीचे तिबोर कापु आणि अमेरिकेतील अनुभवी पेगी व्हिट्सन यांचा समावेश आहे. शूभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. याआधी १९८४ साली राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर ठरले होते. अॅक्सियम कंपनीची ही चौथी मोहीम आहे.
या मोहिमेचे वैशिष्ट्य : अॅक्सियम-4 ही एक कमर्शियल म्हणजे व्यावसायिक मोहिम आहे. अॅक्सियम स्पेस नावाच्या अमेरिकन कंपनीनं ती आखली आहे. त्यांचं मुख्यालय अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या ह्यूस्टन शहरात आहे. अॅक्सियम स्पेसनं नासा आणि इलॉन मस्क यांची स्पेसएक्स यांच्या सहकार्यानं ही मोहिम आखली आहे. त्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटचा वापर करण्यात आला. अॅक्सियम कंपनीचं हे चौथी मोहीम असून पहिल्यांदाच भारतीय अंतराळवीर या मोहिमेमध्ये सहभागी झाला आहे. तर नासाशिवाय भारताची इस्रो ही अंतराळ संस्था आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांचाही या मोहिमेत सहभाग आहे. या मोहिमेत यानातली एक जागा इस्रोनं 550 कोटी रुपये देऊन विकत घेतली आहे.
एक्सिओम-4 मिशनद्वारे स्पेसेक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रासोबत जोडलं गेलं आहे. ड्रॅगन कॅप्सूल निश्चित करण्यात आलेल्या वेळेपेक्षा २० मिनिटं अगोदर डॉक झालं. यानंतर १ ते २ तास पडताळणी केली जाईल. त्यानंतर हवेच्या दबावाची स्थिरता याची पुष्टी केली जाईळ. त्यानंतर अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात प्रवेश करतील.
हे यान २८ हजार किमी / तास वेगानं ४१८ किमी उंचीवर पृथ्वीसभोवती फिरत आहे. लाँचनंतर २६ तासांचा प्रवास केल्यानंतर अंतराळवीर अवकाश संशोधन केंद्रात दाखल होण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यासाठी यानानं काही ऑर्बिटल मॅन्यूवर्स केले असून ज्यामुळं ड्रॅगन आयएसएस सोबत अलाईन होईल. ड्रॅगन कॅप्सूलची आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रासोबत डॉकिंगची स्वंयचलित प्रक्रिया आहे. मात्र, शुभांशू आणि कमांडर पेगी व्हिटसन याचं निरीक्षण करतील.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अंतराळवीरांचे अभिनंदन एक्सिओम-4 डॉकिंगची प्रक्रिया यशस्वी झाली. शुभांशू आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात पाऊल ठेवण्यास तयार असल्याचं ते म्हणाले.
शुभांशू शुक्ला यांचा १४ दिवस अवकाश केंद्रात मुक्काम असेल. यामध्ये उत्सुकता आणि आशा दिसून येत असल्याचं म्हटलं.
रॉकेटने उड्डाण यशस्वी केल्यानंतर मार्गक्रमण करत असताना शुभांशु यांनी अंतराळातून हिंदीत पृथ्वीवर संदेश पाठवला. ते म्हणाले, “ही माझ्या अंतराळ प्रवासाची सुरुवात नाही, तर भारताच्या अंतराळातील मानवी मोहिमांची सुरुवात आहे. तुम्ही सगळे देशबांधव या प्रवासात माझ्यासोबत आहात.”