कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
कमला सोहोनी या भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होय. त्या विशेषतः जैवरसायनशास्त्र (Biochemistry) या क्षेत्रात खूप महत्त्वपूर्ण कामासाठी ओळखल्या जातात. त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात महिलांसाठी नवे दार उघडले आणि पुरुषप्रधान समाजात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांचा आज – ८ सप्टेंबर स्मृतिदिन यानिमित्त त्यांच्या विषयी…
कमला भागवत सोहोनी यांचा जन्म १८ जून १९१२, इंदूर, मध्यप्रदेश येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एससी. व एम.एससी बॉम्बे युनिव्हर्सिटी येथे झाले. त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीत डॉक्टरेट केली.
कमला सोहोनी यांचा जन्म एका सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि काका दोघेही वैज्ञानिक होते. त्यामुळे त्यांना बालपणापासूनच विज्ञानात रस होता. त्यांनी बी.एससी. मध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स घेतले आणि उत्कृष्ट गुणांनी पदवी प्राप्त केली.
तेव्हा प्रख्यात शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या अंतर्गत भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे एम.एसी किंवा पीएच.डी करणं ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट होती. कमला सोहोनी यांनी भारतीय विज्ञान संस्थेत प्रवेशासाठी अर्ज केला, पण सी. व्ही. रामन यांनी “महिलांना संशोधनासाठी आवश्यक झेप लागू शकत नाही” असं म्हणत सुरुवातीला नकार दिला. अखेर त्यांच्या हट्टामुळे, एक वर्षाच्या परीक्षण कालावधीसाठी त्यांना प्रवेश मिळाला. त्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे संपूर्ण प्रवेश न देता “प्रयोग म्हणून” घेतलं गेलं. पण कमलाजींनी आपल्या मेहनतीने आणि शिस्तबद्ध कामाने आपल्या संशोधनाचे महत्त्व सिद्ध केलं, आणि शेवटी सी. व्ही. रामन यांनाही त्यांचं कौतुक करावं लागलं.
पुढे त्यांनी केंब्रिज युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. पूर्ण केली. त्यांचे संशोधन मुख्यतः अन्नातील पौष्टिक घटक, प्रथिने, जीवनसत्त्वे यांच्यावर आधारित होते. त्यांनी “Cytochrome C” नावाच्या घटकावर संशोधन केलं, जो पेशीतील उर्जेच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. त्या भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या ज्यांनी Cytochrome C चा शोध लावला आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
—————————————————————————————————



