आता दुसऱ्या देशातही भारताचं ‘ब्रह्मोस’ सुपरसॉनिक मिसाइल.

0
100
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

भारताचे सर्वात एडवान्स सुपरसॉनिक मिसाइल आता चीनच्या शेजारील फिलीपींस या देशात पोहोचलं आहे. त्यामुळे भारताच्या सैन्य क्षमतेची मायदेशातच नाही, दुसऱ्या देशातही ताकद दिसून येतेय. तसेच फिलीपींसच्या २१ सैनिकांना भारतात ब्रह्मोस सिस्टम ऑपरेट करण्याचं ट्रेनिंग मिळालं आहे. या प्रकारे भारत फक्त सिस्टिम नाही, तर टेक्नोलॉजी आणि स्किल सुद्धा निर्यात करत आहे.

भारताने फिलीपींसला ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल सिस्टमची दुसरी बॅटरी पाठवली आहे. ही डिलीवरी २०२२ साली झालेल्या ₹ २८०० कोटीच्या कराराचा भाग आहे. या करारानुसार एकूण तीन बॅटऱ्या देण्यात येणार आहेत. पहिली बॅटरी २०२४ साली एअरलिफ्ट करण्यात आली. दुसरी एप्रिल २०२५ मध्ये समुद्रमार्गाने पाठवण्यात आली. ब्रह्मोसचा स्पीड २.८ मॅक आणि हे क्षेपणास्त्र २९० किलोमीटर अंतरावरील टार्गेट उद्धवस्त करु शकते. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे समुद्रातील घातक अस्त्र मानलं जातं. ही डील भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ रणनितीचा भाग आहे.

जानेवारी २०२२ साली झालेल्या करारातंर्गत भारत फिलीपींसला तीन बॅटरी समूहाची ब्रह्मोस क्रूज मिसाइल सिस्टम द्यायची आहे. भारताचा हा सर्वात मोठा संरक्षण निर्यात करार आहे आणि फिलीपींस या मिसाइलचा पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक आहे. ब्रह्मोसची पहिली बॅटरी एप्रिल २०२४ मध्ये इंडियन एअर फोर्सच्या IL-76 विमानाने पाठवण्यात आली होती. दुसरी बॅटरी एप्रिल २०२५ मध्ये समुद्रमार्गे पाठवण्यात आली आहे. तिसऱ्या बॅटरीची डिलिव्हरी येणाऱ्या महिन्यांमध्ये होईल.

याची रेंज २९० किलोमीटर :

भारत आणि रशियाने मिळून ब्रह्मोस मिसाइल विकसित केलं आहे. २.८ मॅक म्हणजे ध्वनीच्या गतीपेक्षा तीन पट वेगवान हे क्षेपणास्त्र आहे. याची रेंज २९० किलोमीटर आहे. अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर प्रहार करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. हे मिसाइल जमीन, समुद्र, पाणबुडी आणि एअरक्राफ्ट सारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन लॉन्च केलं जाऊ शकतं.

निर्यात करणारा देश बनला :

ब्रह्मोसच्या डिलीवरीमुळे फिलीपींसला आपल्या समुद्र सीमेच रक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. दक्षिण चीन सागरात चीनच्या वारंवार कुरापती सुरु असतात. फिलीपींस ब्रह्मोसचा आपल्या मरीन कॉर्प्सच्या कोस्टल डिफेंस यूनिटमध्ये वापर करणार आहे. या सिस्टिममध्ये मिसाइलशिवाय मोबाइल लॉन्चर्स, रडार सिस्टम आणि कमांड-अँड-कंट्रोल यूनिट आहे. यामुळे फिलीपींसची देखरेख आणि रिसपॉन्स कॅपेसिटीमध्ये मोठी वाढ होईल. या कारारामुळे भारत आता संरक्षण सामुग्री आयात करणारा नाही, तर निर्यात करणारा देश बनला आहे.

————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here