spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeआंतरराष्ट्रीयभारताचे ब्रह्मोस मिसाइल सुरक्षेत निर्णायक

भारताचे ब्रह्मोस मिसाइल सुरक्षेत निर्णायक

फिलीपींसला तिसरी बॅच, व्हिएतनाम व इंडोनेशियाशीही करार प्रगतीत

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

भारताने आपल्या अत्याधुनिक ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइलच्या निर्यातीस गती दिली असून, फिलीपींसला तिसरी बॅच लवकरच पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. दक्षिण चीन सागरातील सुरक्षेच्या समीकरणात हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

फिलीपींसने २०२२ मध्ये भारतासोबत ३७५ मिलियन डॉलर ( जवळपास ३,००० कोटी रुपये ) किंमतीचा करार केला होता. या करारांतर्गत तीन ब्रह्मोस बॅटऱ्या समाविष्ट असून प्रत्येक बॅटरीमध्ये २९० किलोमीटर रेंज आणि मॅक २.८ वेग असलेली मिसाइल्स आहेत. पहिली बॅच एप्रिल- २०२४ मध्ये आणि दुसरी एप्रिल- २०२५ मध्ये पोहोचवण्यात आली. आता तिसरी बॅच वेळेवर दिली जाणार असल्याचे ब्रह्मोस एयरोस्पेसचे CEO आणि MD जयतीर्थ जोशी यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, “ मिसाइल तयार आहे. आम्ही वेळेवर डिलीवर करू. हा करार भारत-फिलीपींस संबंध अधिक मजबूत करेल.” फिलीपींसने ब्रह्मोस मिसाइल आपल्या ‘होराइझन 3 मॉडर्नायजेशन प्रोग्राम’मध्ये समाविष्ट केले असून, अजून जास्त ब्रह्मोस मिसाइल खरेदी करण्यासही रस दाखवला आहे. या शस्त्रामुळे फिलीपींसच्या किनारपट्टीची सुरक्षा भक्कम होणार असून समुद्री सुरक्षेतील त्यांचा प्रभाव वाढणार आहे. फिलीपींसची समुद्री शत्रुत्वाची मुख्य चिंता चीनशी आहे.

व्हिएतनाम – दुसरा ग्राहक
फिलीपींसनंतर व्हिएतनाम भारतासोबत ७०० मिलियन डॉलर ( जवळपास ५,९९० कोटी रुपये ) किमतीच्या ब्रह्मोस कराराच्या अंतिम टप्प्यात आहे. दक्षिण चीन सागरात व्हिएतनामचे नौदल अधिक सक्षम होणार असून एप्रिल- २०२५ पासून या चर्चांना वेग आला आहे. लवकरच या करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. व्हिएतनाम ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा आशियाई देश ठरणार आहे.
इंडोनेशिया – तिसरी ग्राहक राष्ट्र
भारताने ऑपरेशन सिंदूरदरम्यान ब्रह्मोस मिसाइलच्या यशस्वी क्षमतेने जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर इंडोनेशिया ४५० मिलियन डॉलर ( जवळपास ३,८०० कोटी रुपये ) किमतीचा करार करण्यासाठी तयारीत आहे. फिलीपींस आणि  व्हिएतनामनंतर इंडोनेशिया तिसरा ग्राहक ठरणार असून, दक्षिण आशियातील सामरिक संतुलनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

भारताचे ब्रह्मोस मिसाइल आता केवळ देशाची सुरक्षात्मक ताकद न राहता, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियाच्या समुद्री सुरक्षेतील प्रभावी घटक बनत आहे. या निर्यात करारांमुळे भारताची संरक्षण सहकार्याची प्रतिमा आणखी दृढ होत आहे.

—————————————————————————————————–
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments