नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारत १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा आयसीसी विमेन्स वनडे वर्ल्ड कप २०२५ चे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी भारताने २०१३ मध्ये या प्रतिष्ठित स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आता ३० सप्टेंबरपासून पुन्हा एकदा भारतात हा महत्त्वपूर्ण क्रिकेट सोहळा रंगणार असून, संपूर्ण देशात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे एका सामन्याचं तिकीट फक्त १०० रुपयांत उपलब्ध होणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन सामना 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे पार पडणार असून, यात यजमान भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. भारतीय महिला संघाने गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली असून, या वेळेस विश्वविजेतेपद पटकावण्याचा निर्धार संघाने केला आहे.
वर्ल्ड कप २०२५ :
-
यजमान देश: भारत
-
प्रारंभ दिनांक: ३० सप्टेंबर २०२५
-
उद्घाटन सामना: भारत विरुद्ध श्रीलंका, स्थळ: गुवाहाटी
-
सहभागी संघ: १० आंतरराष्ट्रीय महिला संघ
-
अंतिम सामना: नोव्हेंबर २०२५ मध्ये खेळवला जाण्याची शक्यता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयसीसी यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध शहरांतील स्टेडियम्सना अंतिम रूप दिलं जात असून, प्रेक्षकांसाठीही विविध सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक, कर्णधार आणि सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. देशभरातील चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आहे.
तिकीट फक्त शंभर रुपये
या स्पर्धेतील सर्व सामन्यांसाठी ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे उपलब्ध आहे. म्हणजेच एका कॉफीपेक्षा स्वस्तात वर्ल्ड कपचा थरार थेट स्टेडियममध्ये अनुभवता येणार आहे.
तिकीट बुक असे करायचे
- अधिकृत संकेतस्थळावर लॉग-इन करून “बुक माय शो” लिंकवर पोहोचता येईल.
- तिथे तुम्हाला सर्व पाच स्टेडियमची यादी दिसेल.
- ज्या ठिकाणी सामना पाहायचा आहे, ते निवडा आणि “बुक नाऊ” वर क्लिक करा.
- ऑनलाईन पेमेंट करून तिकीट लगेच मिळेल.
- ४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत गूगल पे युजर्ससाठी प्री-सेल विंडो आहे.
- ९ सप्टेंबरपासून सर्वांसाठी सार्वजनिक विक्री सुरू होईल.
सामने कुठे
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
एसीए स्टेडियम, गुवाहाटी
एसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम
होल्कर स्टेडियम, इंदूर
आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
सहभागी संघ
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान हे आठ संघ यावेळी खेळणार आहेत. राउंड-रॉबिन फेरीत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एकदा भिडणार असून २८ सामने खेळवले जातील. टॉप4 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.



