प्रसारमाध्यम : स्पोर्टस डेस्क
यंदाच्या आशिया कप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असूनही, BCCI ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच युनायटेड अरब एमिरात्स (UAE) मध्ये घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. BCCI आणि यूएई क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेल्या प्राथमिक चर्चेनुसार तीन स्टेडियम निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी दुबई आणि अबुधाबी येथील दोन मैदानांवरच सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) ढाकामधील नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत स्पर्धेबाबत या बाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे.
भारत-पाकिस्तान एकाच गटात ?
स्पर्धेच्या गट रचनेबाबतही चर्चा झाली असून भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील थरारक सामना निश्चितच रंगणार आहे. हा सामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.
वेळापत्रकाची प्रतीक्षा
आशिया कप २०२५ चं अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र, ७ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा पार पडेल, असा अंदाज आहे. या वेळापत्रकावर अंतिम निर्णय BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि ACC चे चेअरमन मोहसिन नकवी घेणार आहेत.
मुख्य ठळक मुद्दे :
-
आशिया कप २०२५ स्पर्धेसाठी मार्ग मोकळा
-
यजमान भारत; आयोजन UAEमध्ये होण्याची शक्यता
-
दुबई व अबुधाबी येथे सामने
-
भारत-पाकिस्तान एकाच गटात असण्याची शक्यता
-
वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा
क्रिकेटप्रेमींसाठी आशिया कप २०२५ ही एक भव्य क्रिकेट मेजवानी ठरणार असून, भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. अधिकृत वेळापत्रक व अंतिम यजमान घोषणेची प्रतीक्षा आता लागून राहिली आहे.
————————————————————————————————–