spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeपशुसंवर्धनभारतामध्ये आता प्राण्यांसाठी रक्तपेढी

भारतामध्ये आता प्राण्यांसाठी रक्तपेढी

रक्तसंक्रमणाची SOP लवकरच

नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

भारतामध्ये सुमारे ५३० दशलक्ष पशुधन असून, पाळीव प्राण्यांची संख्या देखील गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. मात्र, पशुवैद्यकीय क्षेत्रात रक्तसंक्रमण औषधं, रक्तपेढ्या व रक्तसंक्रमण पद्धतींसाठी देशव्यापी नियामक चौकट अद्याप अस्तित्वात नाही. तसेच प्रमाणित प्रोटोकॉल्स नसल्याने उपचारात एकसंधता व सुरक्षिततेचा अभाव जाणवतो.

 केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने गेल्या महिन्यात ‘ भारतातील प्राण्यांसाठी रक्तसंक्रमण आणि रक्तपेढीसाठी मार्गदर्शक तत्त्वे / प्रमाणित कार्यप्रणाली (SOP)’ या मसुद्याची घोषणा केली आहे. या मसुद्यावर तज्ज्ञ, संबंधित संस्था व सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
मसुद्यातील महत्त्वाच्या बाबी
  • प्रमाणित SOPs : रक्तसंकलन, साठवण, तपासणी व संक्रमणाची पद्धत एकसंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे.
  • रक्तपेढ्यांचे नियमन : परवानगी, पायाभूत सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी व स्वच्छता निकष.
  • सुरक्षितता तपासणी : संक्रमणापूर्वी रक्ताच्या गुणवत्तेची व रोगमुक्ततेची खात्री.
  • नोंदवही व मागोवा : प्रत्येक रक्तदान व संक्रमणाची नोंद ठेवणे.
SOPs ची गरज का ?
पशुवैद्यकीय रक्तसंक्रमण हा अनेकदा जीव वाचवणारा उपचार ठरतो. जखम, शस्त्रक्रिया, अपघात, अॅनिमिया किंवा विषबाधा अशा परिस्थितीत. पण प्रमाणित प्रक्रिया नसल्याने संक्रमणात संसर्गाचा धोका, गुणवत्तेतील फरक व उपचारातील अनिश्चितता वाढते. SOPs आल्यास देशभरात उपचार सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह होतील.
या पावलामुळे भारतात प्राण्यांसाठी रक्तपेढी व रक्तसंक्रमणाची पायाभूत यंत्रणा विकसित होण्याची आणि पशुवैद्यकीय सेवांची गुणवत्ता उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
————————————————————————————-
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments