spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

HomeUncategorizedजग हैराण, भारताने बनवलं सर्वात घातक लेझर अस्त्र..

जग हैराण, भारताने बनवलं सर्वात घातक लेझर अस्त्र..

कोल्हापूर : प्रसारमाध्यम आॅनलाईन डेस्क

हे लेझर शस्त्र कसं काम करतं? ते किती वेगळं आहे? त्या बद्दल जाणून घ्या.

भारताच्या हाती एक नवीन घातक अस्त्र लागलं आहे. हे शस्त्र इतकं खतरनाक आहे की, क्षणभरात ड्रोन, मिसाइल आणि शत्रूच्या सेंसरला राख करु शकतं. अलिकडेच DRDO ने याचं परीक्षण केलं. 30-किलोवॉट लेजर बेस्ड डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) Mk-II (A) सिस्टिमच्या परीक्षणासह भारताचा निवडक देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या देशांकडे ही लेजर वेपन सिस्टिम आहे. हे शस्त्र बनवणाऱ्या DRDO ने आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे नेशल ओपन एअर रेंजमध्ये याची चाचणी केली आहे. आतापर्यंत असं लेजर शस्त्र अमेरिका, इस्रायल, रशिया आणि चीनकडेच होतं. आता असं शस्त्र विकसित करणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे. हे लेजर शस्त्र कसं काम करतं? हे किती वेगळं आहे? या बद्दल जाणून घेऊया.

या लेजर शस्त्राच वैशिष्ट्य म्हणजे शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी कुठलाही दारु-गोळा आणि रॉकेटची गरज भासत नाही, फक्त लाइटद्वारे म्हणजे किरणं सोडून काम होऊन जातं. हे शस्त्र वेगळ्या पद्धतीच आहे. लेजर सिस्टिम डिजाइन करण्यासाठी DRDO च्या हाय-एनर्जी सिस्टिम्स सेंटर CHESS ची महत्त्वाची भूमिका आहे. या लेझर शस्त्राच्या निर्मितीमध्ये देशातील काही शैक्षणिक संस्था आणि इंडस्ट्री सुद्धा सहभागी आहेत. हवेत उड्डाण करणाऱ्या ड्रोनवर या लेझर शस्त्राची किरणं पडताच क्षणार्धात ते खाक झालं. शत्रूच्या सेंसरला डॅमेज केलं, चाचणी यशस्वी झाल्याचे ते संकेत होते.

या लेझर शस्त्राची खासियत काय?

हे शस्त्र कसं काम करतं, ते समजून घेऊया. सर्वप्रथम या लेझर वेपनमधील इनबिल्ट इलेक्ट्रो ऑप्टिक (EO) सिस्टम लक्ष्याचा शोध घेते. त्यानंतर DEW प्रकाशाच्या गतीने त्या लक्ष्यावर हल्ला करते. त्यामुळे हवेतील मिसाइल, फायटर जेट, ड्रोन जळून खाकं होतं. लाइटने हल्ला करत असल्याने सैन्यासाठी याचा वापर करणं अधिक सोपं आहे. ग्रुप म्हणजे समूहाने एकत्र येणाऱ्या ड्रोन्सना या शस्त्राद्वारे एकाचवेळी नष्ट करता येतं.

ही, तर फक्त सुरुवात

जिथे आवाजाशिवाय ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे, तिथे लेजर सिस्टिम खूप उपयोगाचे आहे. आवाज न करता आणि धूर काढल्याशिवाय हे आपलं टार्गेट उद्धस्त करतं. युद्धाच्या मैदानात वेगाने शत्रूची ड्रोन्स नष्ट करणं यामुळे शक्य आहे. भारत वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर करुन घातक शस्त्रांची निर्मिती करत आहे. DRDO चेअरमन समीर वी कामत म्हणाले की, “ही, तर फक्त सुरुवात आहे. भारत वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नोलॉजीवर काम करत आहे. त्यामुळे स्टार वॉर सारखी पावर मिळणार आहे” डीआरडीओ चेअरमनच्या वक्तव्यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे, भविष्यात भारतीय सैन्य दलांना अशी शस्त्र मिळणार आहेत, त्यामुळे शत्रूचे धाबे दणाणतील. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही शस्त्र गेमचेंजर ठरतील.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments