इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली

0
265
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) जुलै महिन्यात भरले जातात. यावेळी ३१ जुलै ही तारीख आयटीआर भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र यावेळी सरकारने इन्कम टॅक्स फॉर्म आणि ऑनलाईन पद्धतीत काही सुधारणा केल्यामुळे ३१ जुलैवरून ही अंतिम तारीख १५ सप्टेंबर करण्यात आली आहे. ही तारीख विविध करदात्यासाठी वेगवेगळी आहे. 

ज्यांच्या खात्याचे ऑडिट करणे आवश्यक नसेल, तर अशा व्यक्तीसाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. सरकारने मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी ही तारीख वाढवली आहे. त्याचवेळी, ज्या करदात्यांच्या खात्यांचे ऑडिट अनिवार्य आहे, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर आहे. यामध्ये कंपन्या, प्रोप्रायटरशिप फर्म किंवा फर्मचे कार्यरत भागीदार समाविष्ट आहेत पण या करदात्यांना त्यांचा ऑडिट अहवाल ३० सप्टेंबर पर्यंत सादर करावा लागेल, अशी अट आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवहार करणाऱ्या करदात्यांना आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असून या श्रेणीत येणाऱ्या करदात्यांना कलम ९२ इ अंतर्गत अहवाल सादर करावा लागतो आणि ऑडिट अहवाल ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. व्यवसाय किंवा उत्पन्न आंतरराष्ट्रीय व्यवहारांशी संबंधित असलेल्या करदात्यांना हा नियम लागू होतो.

————————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here