पाच लाख रुपयांच्या ग्रंथसंपदेसह शिवाजी विद्यापीठात भव्य समारंभ
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
शिवाजी विद्यापीठाच्या शरण साहित्य अध्यासनाचे नूतनीकृत कार्यालय आणि पाच लाख रुपयांच्या ग्रंथसंपदेचा हस्तांतरण समारंभ मंगळवारी (दि. २९ एप्रिल) मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या विशेष समारंभाचे उद्घाटन मा. आमदार सतेज (बंटी) पाटील (माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) आणि मा. आमदार जयंतराव असगावकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे आयोजन शरण साहित्य अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी केले आहे.
या प्रसंगी अध्यासनाच्या कार्याची माहिती देत ग्रंथसंपदेचा हस्तांतरण समारंभही संपन्न होणार आहे. या ग्रंथांमुळे संशोधन क्षेत्रात नव्या दालनांना चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण: शरण साहित्य अध्यासन प्रांगण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
वेळ: सायंकाळी ४ वाजता
या महत्त्वपूर्ण सोहळ्यास साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी आणि विद्यापीठ कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि समन्वयक प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी केले आहे.
——————————————————————————————–