राधानगरी प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
यावर्षी उन्हाळ्यामध्येच पावसाने सुरुवात केल्याने राधानगरी धरण हे चक्क मे महिन्यात 50 टक्के इतकं भरलं आहे. धरणाच्या इतिहासात मे महिन्यात धरण 50 टक्के भरण्याचा घटना ही पहिल्यांदाच घडलेली आहे. ही बाब कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाची मानली जात आहे.
दरवर्षी मे महिन्यामध्ये शेती आणि सिंचनासाठी दोन ते सव्वा दोन टीएमसी पाण्याचा विसर्ग धरणातून करावा लागत होता परंतु यावर्षी दहा मे पासून पावसाने सुरुवात केल्यामुळे धरणातील विसर्ग करावा लागला नाही. भोगावती नदी पात्रातील बंधाऱ्यांचे बरगे न काढल्यामुळे पाऊसाच्या काळामध्ये धरणातून विसर्ग करण्यास जलसंपदा विभागाला मर्यादा येत होत्या. आज पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नदीपात्रातील बंदर बंधाऱ्यांचे बर्गे काढून एक जून पासून धरणातून पाण्याचा विसर्ग करून धरणाचा पाणीसाठा कमीत कमी ठेवण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने आकला आहे.
यावर्षी मे मध्येच पावसाने सुरुवात केल्यामुळे जलसंपदा विभागाचं पाणी निसर्गाचे नियोजन कोलमडलं आहे. भविष्यात पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन धरणाची पाणी पातळी निश्चयांकी करण्याचं नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.



