आरोग्य, परिवहनासह पायाभूत सुविधांना गती

मंत्रिमंडळ बैठक

0
113
A meeting of the Maharashtra State Cabinet was held today (September 23) under the chairmanship of Chief Minister Devendra Fadnavis.
Google search engine
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२३ सप्टेंबर) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य, परिवहन, महसूल, गृह आणि गृहनिर्माण यांसारख्या विविध विभागांना चालना देणारे आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

बैठकीतील ठळक निर्णय
१) आरोग्य विभाग
शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीस राखीव निधी मंजूर.
विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – जन आरोग्य योजना यांतून रुग्णांच्या उपचार दाव्यांमधून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास परवानगी.
२) परिवहन विभाग
नागपूर–नागभीड रेल्वे मार्ग (१९३.१५ कि.मी.) ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी ४९१ कोटी ५ लाख रुपये खर्च मंजूर.
रेल्वे प्रकल्पास गती मिळेल, त्यामुळे वाहतूक सुधारेल.
३) महसूल विभाग – अकोला
अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलासाठी २४,५७९.८२ चौ. मी. जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी.
४) महसूल विभाग – सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी येथील महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत मंजूर.
५) महसूल विभाग – वसई–विरार
मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलसाठी आचोळे (ता. वसई, जि. पालघर) येथील जमीन देण्यास मंजुरी.
६) महसूल विभाग – नाशिक
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, नाशिकरोड यांना मौजे देवळाली (ता. जि. नाशिक) येथील १०५५.२५ चौ.मी. जमीन देण्यास मान्यता.
७) गृह विभाग – मुंबई
घाटकोपर येथील बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी अहवालास स्वीकारले.
न्यायमूर्ती श्री. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवर संबंधित विभागांना एक महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश.
८) गृहनिर्माण विभाग – अंधेरी, मुंबई
सरदार वल्लभभाई पटेल नगर ( एसव्हीपी नगर ) येथील सामूहिक पुनर्विकास प्रकल्प राबवणार.
या प्रकल्पात १२२ संस्थात्मक आणि ३०७ वैयक्तिक भूखंडांवरील ४,९७३ सदनिकांचा पुनर्विकास समाविष्ट आहे.
या सर्व निर्णयांमुळे राज्यातील आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण प्रकल्प आणि स्थानिक विकासाला मोठा चालना मिळेल, तसेच नागरिकांसाठी सेवांचे दर्जा उंचावेल.
————————————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here