कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेती, फळ पिके, घरे व गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना –
- जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरु करावे तसेच पथकांची नियुक्ती केली नसल्यास तातडीने आदेश निर्गमित करुन उद्यापासून पंचनाम्याचे काम सुरु करण्यात यावे.
- तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अंतिम अहवाल जिल्हा कार्यालयास ३१ मे २०२५ पूर्वी सादर करण्यात यावा.
- जिल्ह्यातील निवारा केंद्राची जागा निश्चित करुन त्यामध्ये आवश्यक सुविधाची तपासणी करावी तसेच आवश्यक दुरुत्या दोन दिवसांत पूर्ण करुन तसा अहवाल सादर करावा.
- तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष १ जून २०२५ पासून पूर्ण वेळ कार्यरत ठेवावे, संबंधित कामकाज पाहणारे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत.
- गावपातळीवरील सर्व आवश्यक संपर्क क्रमांक तपासणी करुन खात्री करावी.
- आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील व इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करुन गावामध्ये मीडिया ग्रुपवर पाठवावेत.
- गावपातळीवरील यंत्रणा सुसज्ज ठेवावी
- नैसर्गिक आपत्तीमुळे घडणाऱ्या घटनांची तात्काळ नोंद घेऊन तालुका आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत जिल्हा नियंत्रण कक्षास कळविण्यात यावी
- जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, धरणे, धबधबे येथे पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यास वाहन वाहतूक थांबवून सूचना फलक लावण्यात यावे.
- जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षेची खबरदारी घ्यावी. पूर्वी घोषित केलेल्या ८६ भूस्खलन संभाव्य गावांमध्ये सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.
- इतर संभाव्य भूस्खलन स्थळांचीही पाहणी करुन संबंधित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
———————————————————————————