spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeशिक्षणपुण्यात आयआयएम कॅम्पस सुरु होणार

पुण्यात आयआयएम कॅम्पस सुरु होणार

पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये देशात सातवा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला आता आणखी एक मानाचा तुरा मिळणार आहे. मोशी परिसरात तब्बल ७० एकर जागेवर भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कॅम्पससाठी जागा उपलब्ध करून दिली असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आयआयएम म्हणजे काय : 

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) देशातील सर्वोच्च व्यवस्थापन शिक्षण देणारी संस्था मानली जाते. येथे एमबीए आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसोबतच संशोधन, उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक प्रशिक्षण, तसेच उद्योजकतेला चालना दिली जाते. जागतिक स्तरावर सक्षम व्यवस्थापक आणि उद्योगनेते घडवणे हेच या संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील तिसरे आयआयएम

सध्या देशभरात एकूण २१ आयआयएम कार्यरत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात आधीपासून मुंबई आणि नागपूर येथे दोन आयआयएम आहेत. आता पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या शाखेची भर पडणार असून हे राज्यातील तिसरे आयआयएम ठरणार आहे. आयआयएम नागपूरच्या या शाखेसाठी गेले वर्षभर सातत्याने पाठपुरावा सुरू होता आणि अखेर त्याला यश मिळाले आहे.

औद्योगिक पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

पुणे जिल्ह्याची ओळख उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी आहे. या पार्श्वभूमीवर आयआयएमची उभारणी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा मानस आता प्रत्यक्षात उतरत असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. या संदर्भात पुणे, मुंबई आणि नागपूर येथे काही महत्त्वाच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोशीतील ७० एकर जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे.

अपेक्षित फायदे

या कॅम्पसच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वोच्च दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण मिळणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे उद्योग क्षेत्र, रोजगाराच्या संधी आणि संशोधन व उद्योजकतेलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

—————————————————————————————————-

 

 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments