कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
ग्राहकांची नाराजी पाहून आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वी आयसीआयसीआय बँकेने शहरी भागातील ग्राहकांसाठी किमान बॅलेन्सची मर्यादा ही ५० हजार रुपये केली होती. किमान मर्यादा ५० हजार केल्यानंतर अनेक ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती. लोकांमधील नाराजी पाहून बँकेने आपला निर्णय बदलला आहे. आता बँकेने बचत खात्याच्या नियमांत बदल केले आहेत.
आयसीआयसीआय बँकेने मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांसाठी आता नवीन बचत खाते उघडणाऱ्यांसाठी किमान मासिक सरासरी बॅलन्स १५ हजार रुपये ठेवावा लागेल असे आवाहन केले आहे. पूर्वी ही अट जास्त होती. पण आता ती कमी करण्यात आली आहे.
मेट्रो आणि शहरी परिसरात बचत खात्यामध्ये कमीतकमी मासिक सरासरी बॅलेन्सची मर्यादा बदलली आहे. तर आता निमशहरी क्षेत्रासाठी २५ हजार रुपयांनी कमी करुन साडेसात हजार रुपये आणि ग्रामीण क्षेत्रात दहा हजार रुपयांनी कमी करुन अडीच हजार रुपये करण्यात आली आहे. मात्र ग्राहकांनी खात्यामध्ये मर्यादेपेक्षा कमी बॅलेन्स ठेवल्यास त्यांना पेनल्टी लागू शकते.
आयसीआयसीआयने अलीकडेच निमयांत बदल करून सेव्हिंग अकाउंटमध्ये बॅलेन्सची किमान मर्यादा दुप्पटीने वाढवली होती. या बदलामुळं खात्यात कमीत कमी दहा हजार रुपये नव्हे तर पन्नास हजार रुपयांची मर्यादा करण्यात आली होती. मात्र आयसीआयसीआयच्या या निर्णयाचा अनेकांनी विरोध केला होता. विरोधानंतर अखेर हा निर्णय बदलण्यात आला.
नवीन नियम असे : – मेट्रो आणि शहरी भागातील खात्यांसाठी किमान रक्कम – १५ हजार रुपये, निम-शहरी भागांसाठी किमान रक्कम ७,५०० रुपये, ग्रामीण भागांसाठी किमान रक्कम: २,५०० रुपये.
——————————————————————————————————



