spot_img
शुक्रवार, नोव्हेंबर 7, 2025

9049065657

Homeक्रिडाइचलकरंजीचा विवान सोनी अकरा वर्षाखालील राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय : राष्ट्रीय...

इचलकरंजीचा विवान सोनी अकरा वर्षाखालील राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय : राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड..

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना मान्य पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कलने आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत इचलकरंजीच्या विवान प्रमोद सोनीने आठ पैकी सात गुण मिळवून तृतीय स्थान पटकाविले आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याची जळगाव येथे ऑगस्ट मध्ये होणाऱ्या अकरा वर्षाखालील मुलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी   महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

श्री गणेश सभागृह व अश्वमेघ हॉल, कर्वे रोड, पुणे येथे झालेल्या या महाराष्ट्र राज्य अकरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ ३०२ बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. यापैकी मुलांच्या गटात २२० मुलांनी तर मुलींच्या गटात ८२ मुलींनी भाग घेतला होता. स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या विवान सोनीला पाचवे मानांकन मिळाले होते. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत विवानने पहिल्या पाच फेऱ्यात अविराज चिरागिया (पुणे), प्रेयास वाघमारे (पुणे), श्लोक पवार (मुंबई), विहान राव (मुंबई) व ईशान अर्जुन पुणे) या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत पाच गुणांसह संयुक्त आघाडी घेण्यात यश मिळवले. नंतर सहाव्या फेरीत मुंबईच्या निर्वाण शहाशी बरोबरी साधली आणि महत्त्वाच्या सातव्या फेरीत द्वितीय मानांकित मुंबईच्या अर्जुन सिंगला पराभूत करून आघाडी शाबूत राखली.

अंतिम आठव्या फेरीत मुंबईच्या रेयांश व्यंकट बरोबर कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवून विवान ने आपले तृतीय स्थान निश्चित केले व अकरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. मुंबईच्या निर्वाण शहा ने साडेसात गुणासह अजिंक्यपद पटकाविले तर मुंबईच्याच विहान अग्रवाल ला उपविजेतेपद मिळाले. पोदार इंटरनॅशनल स्कूल,यड्रावमध्ये विवान सोनी इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे. सध्या विवानला अनिश गांधी आणि समुख गायकवाड यांचे बुद्धिबळ प्रशिक्षण लाभत आहे. त्याचबरोबर पोदार इंटरनॅशनल स्कूल,यड्रावचे प्राचार्य ईश्वर पाटील, विवानचे वडील प्रमोद सोनी आणि आई पुनम सोनी, चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले आणि मनिष मारुलकर या सर्वांचे प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments