spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeराजकीयइचलकरंजी महानगरपालिकेला ६५७ कोटी अनुदान मिळणार

इचलकरंजी महानगरपालिकेला ६५७ कोटी अनुदान मिळणार

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

इचलकरंजी महानगरपालिकेला वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हे अनुदान पाच वर्षात ६५७ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. या निर्णयासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १० निर्णय घेण्यात आले. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

फक्त पाचशे रुपयामध्ये शेतीचा वाटणी होणार

महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपापसात वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता फक्त ५०० रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या आधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम मोजावी लागायची. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले निर्णय

  • रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुहित जीवन ट्रस्च्या  एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळेस तसेच,पदांना मान्यता. 
  • शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखकाची पदे निर्माण करण्यास मान्यता.
  • इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता. इचलकरंजीला ६५७ कोटी , जालन्याला ३९२ कोटी पाच वर्षांत मिळणार 
  • शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ. 
  • पत्रकार क्लब ऑफ नागपूर, नागपूर यांना देण्यात आलेल्या जमीनीबाबतच्या अटी-शर्तीमध्ये बदल करण्यास मान्यता.
  •  फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लि. (FDCM Ltd.) मधील १ हजार ३५१ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मंजूरी
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास मान्यता. 
  • अशियाई विकास बैंक (ADB) सहाय्यित “महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प” संस्थेवर पणन मंत्री पदसिध्द अध्यक्ष राहणार. 
  • कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात  “उप कृषि अधिकारी” व “सहायक कृषि अधिकारी” असा बदल 
  • महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील १९५ कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर 
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments