प्रसारमाध्यम : स्पोर्टस् डेस्क
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आगामी पाच वर्षांत एकूण ९ आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे. या सर्व स्पर्धांसाठी यजमान देशांची अधिकृत यादी ICC कडून नुकतीच जाहीर करण्यात आली असून भारतात तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापैकी दोन स्पर्धा भारताने संयुक्तपणे आयोजित करायच्या आहेत.
२०२६ T २० वर्ल्डकप : भारत-श्रीलंका यजमान
ICC कॅलेंडरनुसार २०२६ साली होणारा T २० विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. हा T २० वर्ल्डकप भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण मागच्या पर्वात भारताने जेतेपद पटकावले होते. त्यामुळे २०२६ मध्ये विजेतेपद कायम राखण्याचे लक्ष्य भारतीय संघापुढे असेल.
२०२७ कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना आणि वनडे वर्ल्डकप
२०२७ मध्ये होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (WTC Final) इंग्लंडमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्याच वर्षीचा वनडे विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तिन्ही देशांत होणार आहे.
या स्पर्धेकडे अनेक दिग्गजांच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्याची शक्यता म्हणूनही पाहिलं जातं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची ODI क्रिकेटमधून निवृत्ती अद्याप झालेली नसली, तरी २०२७ पर्यंत हे दोघं खेळतील की नाही, यावर अनिश्चितता आहे. कारण अजूनही दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे आणि तोपर्यंत संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
२०२६ T २० विश्वचषकासाठी तयारी सुरू
दरम्यान, भारताचा संघ २०२६ साली होणाऱ्या T २० वर्ल्डकपसाठी जोरदार तयारी करत आहे. मागील वर्ल्डकपमध्ये जेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघ यंदाही पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये ही स्पर्धा होणार असल्याने, त्यासाठी सध्या सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
ICC च्या आगामी ९ स्पर्धांमध्ये भारताची भूमिका केवळ यजमान देश म्हणूनच नाही, तर प्रमुख दावेदार संघ म्हणूनही महत्त्वाची ठरणार आहे. रोहित-विराट यांची उपस्थिती, संघाचा सध्याचा फॉर्म आणि आगामी स्पर्धांसाठीची रणनीती यावर भारतीय क्रिकेटचं भवितव्य अवलंबून राहणार आहे.
——————————————————————————————-