spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeपर्यावरणकोल्हापुरात गणेशमूर्ती दान उपक्रमास उदंड प्रतिसाद

कोल्हापुरात गणेशमूर्ती दान उपक्रमास उदंड प्रतिसाद

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात तब्बल साडे तीन लाखाहून अधिक विसर्जित मूर्ती दान

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

गेल्या दहा वर्षापासून कोल्हापुरात सुरु असलेल्यां गणेशमूर्ती दान व निर्माल्य दान उपक्रमास यावर्षीही उदंड प्रतिसाद मिळाला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल साडे तीन लाखाहून अधिक विसर्जित मूर्ती दान करण्यात आल्या. तसेच शेकडो टन निर्माल्यही जमा झाले. कोल्हापूर महापालिका हद्दीत ४८ हजार ४२३ गणेश मूर्ती संकलित झाल्या. तर जिल्हयात दोन लाख ९० हजार ७४८ मूर्ती संकलित झाल्या असे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. जिल्ह्यातील काही नागरिकांनी २९३१ गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी केले.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने जिल्हा परिषद व महापालिकेतर्फे गेल्या पाच वर्षापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही कोल्हापूर महापालिका व जिल्हा परिषदेने नागरिकांना गणेश मूर्ती व निर्माल्य यांचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. यासाठी तशी सोयही स्थानिक स्वराज्य संस्थांनी केली होती. ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले होते. तलाव, पाणवठे प्रदूषित होणार नाहीत यासाठी खबरदारी घेतली होते. कोल्हापुरात महापालिका हद्दीतही प्रभागनिहाय कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले होते. इराणी खण येथे मूर्ती विसर्जनाची सोय केली होती.

महापालिका प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व त्या अनुषंगाने सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केल्या होत्या. पंचगंगा घट परिसरातील अपवाद वगळता इतर ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनाचा गजर घुमला. रंकाळा तलाव, इराणी खण, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, राजाराम बंधारा, कळंबा तलाव येथे मूर्ती दान व निर्माल्य दान उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या मदतीला होते.

‘जिल्हयातील सर्व गावांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमामध्ये सहभागी होऊन जलस्त्रोत प्रदूषणमुक्त  ठेवावेत’असे आवाहन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले होते. कार्तिकेयन यांनी, चंदगड तालुक्यातील शिनोळी व महिपाळगड या गावांना भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली होती. करवीर तालुक्यात ६८ हजार ५६५ मूर्तीं, हातकणंगले तालुक्यात ३३ हजार ९३५, कागल तालुक्यात ३० हजार ४६६, भुदरगडमध्ये वीस हजार १७४, गडहिंग्लजमध्ये २० हजार २४५, पन्हाळा तालुक्यात २४ हजार ७५९, राधानगरी तालुक्यात २३ हजार ९४२ , आजरा तालुक्यात १६ हजार २३७, चंदगड तालुक्यात १४ हजार १३३ तर गगनबावडा तालुक्यात ४ हजार १८९ तर शिरोळ तालुक्यात १७ हजार २५ गणेशमूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित केल्या.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments