प्रसारमाध्यम : डेस्क
आपल्याला कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या जागेत रोपं लावायची आहेत याचा विचार करूनच नेमकी रोपं लावावीत.
शक्यतो स्थानिक देशी वृक्ष निवडावेत.
रोपाची उंची किमान ५ फूट व खोडाची जाडी किमान २-३ से.मी. असावी.
रोपांचे वय किमान ३ वर्ष असावे.
रोपाची निवड करताना खालील बाबींचा विचार करावा
सदाहरित की पानगळी वृक्ष
फांद्यांची रचना च वृक्षाचा आकार
फुलांचा बहार येण्याचा कालावधी
वृक्ष लागवड आकर्षक फुलांसाठी की पानांसाठी
उत्पन्न देणारी की न देणारी
फळांपासून उपद्रव होणारी की न होणारी
पक्षांना आकर्षित करणारी की न करणारी
वृक्षाची लागवड करताना याबाबत विचार करावा
स्थानिक हवामानास अनुकूल असणाऱ्या देशी वृक्षांची निवड करावी.
दाट वस्तीत मोठ्या आकाराची झाडे लावू नयेत.
पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे वृक्षांची निवड करावी.
नियमित पाणी देणे शक्य असेल तरच वृक्ष लागवड करावी.
सुपीक (गाळाची) माती, शेणखत / कंपोस्टखत / गांडुळखत / सेंद्रीयखत, वनस्पतीजन्य किटकनाशके यांची उपलब्धता असावी.



