कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क
माणसाच्या वाढत्या गरजा आणि वापरलेल्या वस्तूंचे योग्य प्रकारे निर्गत न केल्यामुळे कचरा निर्माण होतो. कचऱ्याचे योग्यप्रकारे आणि वेळच्या वेळी निर्गत न केल्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होते. कचऱ्याची योग्य पद्धतीने निर्गत कशी करायची यासाठीच कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आहे.
कचरा व्यवस्थापन (Waste Management) म्हणजे घन, द्रव अथवा जैविक कचऱ्याचे संकलन, वाहतूक, प्रक्रिया, पुनर्वापर आणि योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची एक प्रणाली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने याचे खूप मोठे महत्त्व आहे कारण हे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अत्यावश्यक ठरते.
कचरा कसा निर्माण होतो : अधिक खरेदी व उधळपट्टी, पुनर्वापराची (recycling) सवय नसणे, योग्य व्यवस्थापनाचा अभाव, जलद शहरीकरण व औद्योगिकीकरण.
कचऱ्याचे प्रकार :
गृहवापरातील कचरा (Household Waste)
-
उरलेलं अन्न, खराब झालेली भाज्या-फळं
-
प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, पॅकिंग मटेरियल
-
पेपर, कागद, जुने कपडे, तुटलेली वस्तू
औद्योगिक कचरा (Industrial Waste)
-
फॅक्टरीतून निर्माण होणारे रसायनं, धातूचे अवशेष
-
उत्पादन प्रक्रियेत उरलेली किंवा न वापरता आलेली सामग्री
कृषी कचरा (Agricultural Waste)
-
उरलेला पाला-पाचोळा, कुजलेली पिकं
-
कीटकनाशक व रसायनांचे अवशेष
इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste)
-
जुनं मोबाईल, संगणक, टी.व्ही., बॅटऱ्या
-
वापरात नसलेली किंवा खराब झालेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं
वैद्यकीय कचरा (Biomedical Waste)
-
हॉस्पिटलमधील सुई, औषधांचे अवशेष, रक्ताने माखलेले कापड
-
मास्क, ग्लोव्ह्ज, सर्जिकल उपकरणे
निर्माणकाम कचरा (Construction and Demolition Waste)
-
विटा, सिमेंट, लोखंड, वाळू, जुने लाकूड
-
इमारती पाडल्यावर उरलेले साहित्य
जल व हवेचा कचरा (Water and Air Pollution Waste)
-
नद्या व समुद्रात सोडलेले दूषित पाणी, प्लास्टिक
-
कारखान्यांतून निघणारा धूर, कार्बन डाय ऑक्साइड इ. वायू
स्वच्छता हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन हे फक्त स्वच्छतेसाठीच नव्हे, तर आरोग्य टिकवण्यासाठीही अत्यावश्यक आहे. शासन, संस्था व नागरिक यांनी एकत्रितपणे यामध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे
——————————————————————————————————