चंदगड प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
चंदगड तालुक्यातील करंजगाव येथील श्री हनुमान विद्यालयाने मार्च २०२५ मध्ये झालेल्या १० वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेचा ९८.३०% निकाल लागला आहे. या शाळेतील ९०% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोग्य सेविका शुभांगी पाटील यांनी रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी “आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता यश मिळवण्यासाठी प्रामाणिक कष्ट करणं गरजेचं आहे”, असं प्रतिपादन केलं.
करंजगाव येथील श्री हनुमान विद्यालयाने मार्च मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत ९८.३०% निकाल लावून घवघवीत संपादन केले आहे. श्री. हनुमान विद्यालय ही शाळा विनाअनुदानित असून चार शिक्षक कार्यरत आहेत. गेले 3 वर्ष या विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी केंद्रात प्रथम येत आहे. या विद्यालयाचे यशातले सातत्य पाहून चंदगड तालुक्यात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका शुभांगीपाटील यांनी स्वखर्चाने या विद्यालयातील ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. “आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेणं गरजेचं आहे. कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळालेलं यशच खऱ्या अर्थाने टिकते आणि जीवनाला दिशा देते,” असे प्रतिपादन यावेळी शुभांगी पाटील यांनी केले.
यावेळी बाबू नेसरकर, परशराम गोरलं, मारुती गावडे, रुकमाना गोरलं, धोंडिबा शिट्याळकर, श्रवण गावडे, उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्राचार्य एस. जे सुतार, जी आर बामणे, एम एल मेटकर, आर आर कांबळे, ए एम गावडे, यांचं मोलाचं सहकार्य लाभलं