आजच्या काळात अनेक महिलांना मासिक पाळी अनियमित येण्याचा त्रास होतो. हार्मोनल असंतुलन, तणाव, चुकीचा आहार, झोपेचा अभाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मासिक पाळी उशिरा येणे, थांबणे किंवा अत्यल्प होणे अशा समस्या निर्माण होतात. अशा वेळी काही नैसर्गिक उपाय वापरल्यास मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. पपई, आलं आणि ओवा हे अशाच काही प्रभावी घटकांमध्ये मोडतात.
१. कच्ची पपई
कच्च्या पपईमध्ये ‘पपेन’ नावाचे एन्झाइम असते, जे गर्भाशयाच्या स्नायूंना उत्तेजित करते. तसेच पपईमुळे इस्ट्रोजेन हार्मोनची निर्मिती वाढते, त्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते.
-
कच्च्या पपईचा रस किंवा तुकडे दिवसातून दोन वेळा सेवन करा.
-
मासिक पाळीच्या काही दिवस आधीच हे सेवन सुरू करणे फायदेशीर ठरते.
२. आलं
आलं गरम तासीर असलेला पदार्थ आहे. यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि गर्भाशयाचे संकुचन (contractions) सुरू होण्यास मदत होते.
-
आल्याचा चहा : एका कप पाण्यात आल्याचे काही तुकडे टाका आणि उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्या.
-
आल्याचा रस : आल्याच्या रसात थोडेसे मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा.
३. ओवा ( कर्वा / अजवाइन )
ओव्यात थायमॉल नावाचा घटक असतो जो गर्भाशयाला उत्तेजित करतो. यामुळे मासिक पाळीशी संबंधित पेटके कमी होतात आणि नियमितता येते.
-
ओवा-गूळ पाणी : १ चमचा ओवा व १ चमचा गूळ एका ग्लास पाण्यात टाकून उकळा.
-
हे पाणी थंड झाल्यावर सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.
-
मासिक पाळीच्या अपेक्षित तारखेच्या ७-८ दिवस आधी हे सेवन सुरू करावे.