spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeअध्यात्मगणेशोत्सवात मुलांच्या उत्साहाला उधाण

गणेशोत्सवात मुलांच्या उत्साहाला उधाण

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

गणेशोत्सव भारावलेला उत्सव. या उत्सवात लहान मुलांचाही तितकाच सहभाग असतो.. घरातील गणपतीची सजावट असो की मंडळाच्या गणपतीची सजावट असो. मुलांचा उत्साह दांडगा असतो. त्यांची कल्पकता आणि धडपड याला तोड नसते. मुल या उत्सवात वाहूनच घेतात. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव ११ दिवस असतो आणि याचा आनंद पूरेपूर घेता यावा म्हणून शाळांना सुट्टी देण्यात येते. यावर्षी तर मुंबईसह कोकणातील सरकारी शाळा प्रशासनाने यंदा विद्यार्थ्यांना ७ दिवस सुट्ट्या दिल्या आहेत.

गणपतीचं आगमन गणेश चतुर्थीला म्हणजे २७ ऑगस्टला होणार आहे. तर गणेशाचं विसर्जन हे गणेश चतुर्दशीला ६ सप्टेंबरला होणार आहे. गणपतीपाठोपाठ तीन दिवस गौराईचं आगमन होतं असतं. मुंबईसह कोकणातील सरकारी शाळांना नेहमी ५ दिवसांच्या सुट्ट्या असतात. पण यंदा विद्यार्थ्यांना ७ दिवसांच्या सुट्ट्या मिळाल्या आहेत.

यावर्षी गौराईचं आगमन ३१ ऑगस्टला होणार असून १ सप्टेंबरला गौरी पूजा आणि २ सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन असणार आहे. कोकणात गौराईसह बाप्पाचे विसर्जन करण्यात येतं. त्यामुळे ज्या घरात गौराई आहे तिथे ५ दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन ७ दिवसांनी होणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील सरकारी शाळा प्रशासनाने यंदा विद्यार्थ्यांना ७ दिवस सुट्ट्या दिल्या आहेत. त्याशिवाय सरकारी बोर्ड सोडता इतर बोर्ड म्हणजे सीबीएसी, आयसीसी बोर्ड शाळांना मुंबईत ५ दिवसांच्या सुट्ट्या असणार आहे.

गणेशोत्सावात मुंबई, कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात २७ ऑगस्ट गणेश चतुर्थी, १ सप्टेंबर गौराई पूजन, ५ सप्टेंबरला ईद – ए – मिलाए आणि ६ सप्टेंबर गणेश विर्सजनाची सुट्टी असते. गणेशोत्सवाचे कलेंडर पाहिल्यास ज्या शाळांना शनिवार रविवार सुट्ट्या आहेत. तिथे वरील सांगितलेला चार दिवसांच्या सुट्ट्या आणि त्यात दोन शनिवार – दोन रविवार यांची मोजणी केल्यास ८ दिवसांची सुट्टी विद्यार्थ्यांना गणेशोत्सव काळात शाळांना मिळणार आहेत.

११ दिवसांच्या गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांना ९ दिवस सुट्ट्या असणार आहे. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर  दरम्यान ७ दिवस सुट्ट्या असणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरला ईद – ए – मिलाए, ६ सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि ७ सप्टेंबरला रविवार अशा एकंदरीत १० दिवस शाळांना मुलांना सुट्ट्या असणार आहेत. ज्या शाळांना ५ दिवस सुट्टी आहे, तिथे ५ आणि ईद – ए – मिलाए, गणेश विसर्जन आणि रविवार अशा मिळून ८ दिवस सुट्टी असणार आहे. तर कॉलेजबद्दलही स्थानिक पातळीवरही जवळपास त्यांना ११ दिवसांच्या काळात साधारण ७- ८ दिवस सुट्ट्या असणार आहे.

———————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments