कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या महिलांच्या टी २० क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला.५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने जिंकले. यासह, संघाने एक सामना शिल्लक असताना मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सवर १२६ धावा केल्या. हे लक्ष्य भारतीय संघाने सहज गाटले. भारताने ६ विकेट्सने हा सामना जिंकला. दोनपेक्षा जास्त सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने इंग्लंडला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी इंग्लंडने सर्व ६ वेळा विजय मिळवला होता.
भारतीय गोलंदाजासमोर इंग्लंडचे फलंदाज सुरुवातीपासूनच अडचणीत दिसत होते. २० वर्षीय चरणीने तिसऱ्याच षटकात डॅनियल वायट हॉगला बाद केले. बॅटिंग पॉवरप्लेमध्ये इंग्लिश संघ २ विकेट्सवर फक्त ३८ धावा करू शकला. दुसरी सलामीवीर सोफी डंकली १९ चेंडूत २२ धावा काढून दीप्ती शर्माचा बळी ठरली. त्यानंतर भारताने एकदाही इंग्लडचा रनरेट ७ च्या वर जाऊ दिला नाही.
इंग्लंडची कर्णधार टॅमी ब्यूमोंटने सर्वाधिक २० धावा केल्या. शेवटच्या षटकात सोफी एक्लेस्टोन (१६) आणि इस्सी वोंग (११) यांनी मिळून १६ धावा केल्या. यासह संघाचा आकडा ११६ धावांवर पोहोचला. भारतासाठी राधा यादवने ४ षटकात १५ धावा देत २ बळी घेतले. खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती पण शेफाली वर्माने वेगवान खेळ दाखवला.
एक नजर यावरही….👇



