मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणाकडे धाव घेताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या शक्यतेमुळे चाकरमान्यांचा प्रवास कठीण होण्याची भीती व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत अवजड वाहनांना मुंबई–गोवा महामार्गावर बंदी घातली आहे.
बंदी सर्वच अवजड वाहनांवर लागू राहणार असली तरी काही वाहनांना सूट देण्यात आली आहे.
-
जयगड व जेएनपीटी बंदरातून आयात-निर्यात माल नेणारी वाहने
-
दूध, पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर
-
औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन
-
अन्नधान्य, भाजीपाला, नाशवंत माल वाहून नेणारी वाहने
या वाहनांसाठी मात्र महामार्ग विभागाकडून प्रवेशपत्र घेणे सक्तीचे असेल.
बंदीचा कालावधी – तीन टप्प्यांत अंमलबजावणी
-
२३ ऑगस्ट मध्यरात्री १२ वा. – २८ ऑगस्ट मध्यरात्री १२ वा.
( गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांच्या मोठ्या लोंढ्यामुळे ) -
३१ ऑगस्ट सकाळी ८ वा. – रात्री ११ वा.
( ५ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन ) -
२ सप्टेंबर सकाळी ८ वा. – रात्री ११ वा.
( ७ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन ) -
६ सप्टेंबर सकाळी ८ वा. – ७ सप्टेंबर रात्री ८ वा.
( अनंत चतुर्दशी विसर्जनासाठी )
अपघात निवारणासाठी उपाययोजना
-
महामार्गावर अपघात झाल्यास वाहने तात्काळ बाजूला करण्यासाठी केन्स व दुरुस्ती पथके तैनात.
-
अवजड वाहनांना थांबवण्यासाठी रत्नागिरी आरटीओची विशेष पथके सज्ज.
-
कशेडी घाट ते खारेपाटणपर्यंत २४ तास गस्त ठेवली जाणार.
चाकरमान्यांचे प्रश्न कायमच
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी दिलासा देणारी असली तरी चाकरमानी आणि कोकणकरांचा एकच सवाल कायम आहे
-
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले मुंबई–गोवा महामार्गाचे काम नेमके कधी पूर्ण होणार?
-
तात्पुरत्या कामांऐवजी खड्डेमुक्त रस्त्यांचा प्रवास नेमका कधी मिळणार?
कोकणातल्या बाप्पाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना या बंदीमुळे प्रवास सुलभ होणार असला, तरी रस्त्यांच्या कामाचा वेग वाढवणे आणि कायमस्वरूपी उपाय करणे हाच त्यांचा सरकारला असलेला ठाम मागणीचा सूर आहे.
———————————————————————————————