मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच राज्यभर पावसाने जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या सरी बरसणार असून, विशेषतः घाटमाथ्यावरील भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
हवामान अंदाज
-
बंगालच्या उपसागरावर पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सोमवारपासूनच मुंबई व उपनगरांवर पावसाचे सावट आहे.
-
याचा परिणाम पुढील चार दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भापर्यंत दिसून येणार आहे.
-
काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकलं, ज्यामुळे कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
-
परिणामी अनेक भागांतील वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे.
पुढील २४ तासांचा अंदाज
-
मध्य महाराष्ट्र : दुर्गम भागात मध्यम ते जोरदार पाऊस
-
मराठवाडा : काही जिल्ह्यांत पावसाच्या सरी
-
कोकण-गोवा दक्षिणेकडील भाग : मध्यम ते जोरदार पाऊस
-
उत्तर कोकण : मुसळधार पावसाची शक्यता
-
मुंबई व उपनगरं : ढगाळ वातावरण + तुरळक सरी
गणेशोत्सवात पावसाचे चित्र
-
26 ते 29 ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या प्रारंभी मुंबईसह कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस
-
पश्चिम महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, सातारा) : घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक
-
मंगळवार-बुधवार : पावसाचा जोर तुलनेनं जास्त
-
गुरुवार-शुक्रवार : किंचित घट अपेक्षित
-
शनिवार-रविवार : ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार
कोल्हापूर-सांगली-सातारा हवामान-
-
कोल्हापूर : घाटमाथ्यावरील भागात मुसळधार पाऊस, शहर व ग्रामीण भागात मध्यम ते जोरदार पाऊस
-
सांगली : कृष्णा काठच्या भागांत मध्यम सरी, तर डोंगराळ भागांत जोरदार पाऊस
-
सातारा : खास करून महाबळेश्वर, पाटण, जावळी आदी भागांत मुसळधार पाऊस, तर इतर ठिकाणी ढगाळ वातावरण



