कोल्हापूर :प्रसारमाध्यम न्यूज
कणात मुसळधार पाऊस सुरु असून मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे यलो ते ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी विशेष खबरदारी घेण्याची सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि घाटमाथा भागातही पुढील ७ दिवसांत सतत वारे, ढगाळ वातावरण आणि ठळक पाऊस होण्याची शक्यता अवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबई आणि रायगडमध्ये आज पाऊस सुरु आहे, अनेक ठिकाणी गोवा-कोकण विभागात पुढील सात दिवसांसाठी सतत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने केला आहे. सह्याद्री घाट परिसरातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. समुद्र उग्र रूप धारण करण्याची श्यक्यता असून समुद्रात जाऊ नये, याची सूचना आपत्ती व्यवस्थापनाने केल्या गेली आहे.
विदर्भ आणि घाटमाथा परिसरात पुढील सात दिवसांत वारे, ढगाळ वातावरण आणि ठळक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज मेघगर्जनासह मुसळधार पावसाची शक्यता असून २२–२४ जुलैला पावसाचे प्रमाण वाढून काही ठिकाणी मध्यम ते जोरदारच असेल. २६–२७ जुलैला पावसाची तीव्रता अधिक वाढेल, विशेषतः शनिवार (२६ जुलै) रोजी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता जास्त. हवामान विभागाने विदर्भ आणि घाटमाथा परिसरात ऑरेंज/येलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भात, नागपूरसह अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी जोरदार अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवसानंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून शेतीची उर्वरीत कामे त्वरित करून घेण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. दोन महिन्यापासून पाऊस सुरु आहे. यामुळे शेतात तन वाढले आहे. पावसाची उघडिपी दरम्यान तन काढून शेत पीकवाढीस तयार करावे असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.
—————————————————————————



