कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी यलो ते ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.