कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला २० जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघात एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. दिल्लीच्या २३ वर्षीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
हर्षित राणा याचा संघात समावेश ही एक आश्चर्यकारक गोष्ट मानली जात आहे. तो लंडनहून लीड्स येथे भारतीय संघासोबत दाखल झाला असून, त्याचा ससावेश संघाच्या वेगवान गोलंदाजी विभागाला अधिक बळकट करण्यासाठी करण्यात आला आहे.
या मालिकेत भारताचे नेतृत्व शुबमन गिल याच्याकडे आहे, तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्स याच्याकडे आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले, लीड्स येथे २० जूनपासून सुरू होईल.
हर्षित राणा याने कसोटी, एकदिवसीय आणि टी २० या तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण केलं आहे. हर्षित टीम इंडियासाठी २ कसोटी, ५ एक दिवसीय आणि १ टी 20 सामने खेळले आहेत. तसचे हर्षितने आयपीएलमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हर्षितने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात संधी देण्यात आली. हर्षितने आयपीएलमध्ये ३३ सामने खेळले आहेत.
इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ असा : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, हर्षित पटेल आणि कुलदीप यादव.
——————————————————————————————————-



