कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात सन- २०२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना व इतर आवास योजनेतून ५० हजार घरकूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करुन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत १० टक्के जि. प. स्वनिधी मधून ग्रामीण भागातील महिलांसाठी पालकमंत्री मकान दुकान योजना सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणार आहे.
महिलांना आवास व उपजिविका यांचा एकत्रित लाभ देणारी पालकमंत्री मकान दुकान योजना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली आहे.
योजनेच्या अटी व निकष :-
-
योजनेचा लाभार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला असावी.
-
लाभार्थ्याने दिनांक १ एप्रिल २०२५ नंतर शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेतून घरकुल बांधकाम पुर्ण केलेले असावे.
-
तथापि १०० दिवसांच्या कालावधीत घरकुल बांधकाम पूर्ण केलेले असल्यास प्राधान्य राहील.
-
दारिद्रय रेषेखालील महिला लाभार्थीस प्राधान्य राहील.
-
घरकुल महिलांच्या नावे असले पाहिजे.
-
योजनेतंर्गत सुरु केले जाणारे किराणा दुकान शासकीय योजनेत बांधलेल्या घरकुलात किंवा घरालगत असावे.
-
ग्रामपंचायतीचे व्यवसायाचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
-
योजनेंतर्गत किराणा मालाच्या दुकानासाठी भांडवल व आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी रक्कम ३० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल.
-
लाभार्थीस किराणा व्यवसाय किमान ३ वर्षे सुरु ठेवणे बंधनकारक आहे.
-
या बाबत लाभार्थ्याने बंधपत्र करुन द्यावे लागेल.
-
लाभार्थ्याने किराणा दुकान सुरु केल्याबाबतचे गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक राहील.