ए. आय शिक्षणासाठी मंत्रालयाचा मोठा निर्णय

Swayam Portal वर मोफत पाच AI कोर्सेस उपलब्ध

0
144
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा 
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ची वाढती मागणी लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्ये मिळावीत यासाठी Swayam Portal वर पाच मोफत AI कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. हे कोर्सेस पूर्णपणे ऑनलाइन असून, विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.
हे पाच AI कोर्सेस पुढीलप्रमाणे आहेत
१. एआय / एमएल पायथॉन (AI/ML Python)
– आर्टिफिशियल इंटेलिजेंस व मशीन लर्निंगची मूलभूत माहिती.
– स्टॅटिस्टिक्स, लिनियर अल्जेब्रा, ऑप्टिमायझेशन, डेटा व्हिज्युअलायझेशनवर भर.
– पायथॉन प्रोग्रामिंगचा समावेश.
– कालावधी : ३६ तास.
२. क्रिकेट ॲनालिटिक्स विथ AI (Cricket Analytics With AI)
– आयआयटी मद्रासच्या प्राध्यापकांनी डिझाइन केलेला कोर्स.
– क्रिकेटच्या उदाहरणातून स्पोर्ट्स ॲनालिटिक्स शिकवला जातो.
– पायथॉन वापरून आकडेवारी समजून घेण्यावर भर.
– कालावधी : २५ तास.
३. एआय इन फिजिक्स (AI in Physics)
– मशीन लर्निंग व न्यूरल नेटवर्क्स वापरून भौतिकशास्त्रातील समस्या सोडवणे.
– इंटरॲक्टिव्ह सेशन्स, प्रात्यक्षिक उदाहरणे, हँड्स-ऑन लॅब वर्क.
– कालावधी : ४५ तास.
४. एआय इन अकाउंटिंग (AI in Accounting)
– वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष.
– अकाउंटिंग क्षेत्रात AI चा वापर समजावला जातो.
– कालावधी : ४५ तास.
५. एआय इन केमिस्ट्री (AI in Chemistry)
– आयआयटी मद्रासचा कोर्स.
– रसायनशास्त्रातील डेटासेट्सवर AI आणि पायथॉनचा वापर.
– औषध डिझाइन व रासायनिक अभिक्रियांचे मॉडेलिंग शिकवले जाते.
– कालावधी : ४५ तास.
या सर्व कोर्सेसच्या शेवटी प्रमाणपत्र परीक्षेची सोय असून, यशस्वी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट दिले जाणार आहे. शिक्षण मंत्रालयाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर AI क्षेत्रात स्पर्धात्मक बनवण्यासाठी मोठी संधी ठरणार आहे.

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here