शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

0
159
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) जून मध्ये इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयाची परीक्षा १८ ते २४ जून या कालावधीत आणि मराठी व हिंदी ३० व ४० श.प्र.मि. विषयाची परीक्षा  ३० जून ते ४ जुलै या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रकाची ऑनलाईन प्रिंट घेता येईल.

विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधित संस्थांच्या लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात येतील. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे `१०० जीएसएम (GSM) कागदावर करुन विद्यार्थ्यांना वितरीत करावीत. तसेच संबंधित विद्यार्थ्यास सॉप्टकॉपी पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी जेणे करुन विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र कलर प्रिंटद्वारे १०० जीएसएम (GSM) कागदावर छपाई करुन घेता येईल. संस्थांनी संबंधित प्रमाणपत्र गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करुन ठेवावी.
निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून १० दिवसात परीक्षार्थींनी गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुण पडताळणीसाठी प्रति विषय रुपये १०० प्रमाणे व छायाप्रती मिळण्यासाठी प्रति विषय रुपये ४०० रुपये रक्कम ऑनलाईन पध्दतीने दिनांक २९ ऑगस्ट पर्यंत भरण्यात यावेत. गुण पडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुर्न-मुल्यांकनासाठी प्रती विषय ६०० रुपये प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, याबाबतच्या सविस्तर सुचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here