भारतीय चित्रपट सृष्टीतील सोनेरी पान : सत्यजीत रे

0
395
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

ऑस्कर पुरस्कार विजेता बंगाली चित्रपट पथेर पांचाली चे दिग्दर्शक सत्यजित रे यांचा आज ( २ मे ) जन्मदिवस. विशेष म्हणजे हा त्यांचा पहिलाच चित्रपट. सत्यजित रे हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या परंपरेकडे विशेष लक्ष देणारे दिग्दर्शक होते. त्यांना कोल्हापूरसारख्या चित्रपट निर्मिती केंद्राबद्दल आस्था होती. रे यांनी काही वेळा जुन्या भारतीय चित्रपटांबद्दल लेखन केलं, जिथे कोल्हापूरचा संदर्भ अप्रत्यक्षपणे त्यांना घ्यावा लागला. रे यांना जसे कोल्हापूरचे सृष्टी सौदर्य भुलवत होते तसेच त्यांना कोल्हापुरातील साहित्यिक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या विषयी आदर आणि प्रेम होते.

कोल्हापूर ही भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे राजा हरिश्चंद्र चिपळूणकर, बाबुराव पेंटर, आणि व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्गजांनी भारतीय सिनेमा घडवला. सत्यजित रे यांच्यावर इटालियन निओ-रिअँलिझमसह भारतीय सिनेमा, विशेषतः शांताराम यांच्या वास्तववादी शैलीचा काही प्रमाणात प्रभाव होता. त्यांनी भारतीय ग्रामीण जीवन, समाज, आणि मानवी भावनांचे चित्रण आपल्या चित्रपटांत प्रभावीपणे केलं. हेच काही अंशी कोल्हापूरच्या चित्रपट परंपरेतही दिसतं.

रे पदवीधर होईपर्यंत साधारण वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत त्यांचा चित्रपट सृष्टीशी संबध आला नव्हता. त्यांचे शालेय शिक्षण कोलकाता येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथे झाले. या महाविद्यालयातून रे यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. याच दरम्यान त्यांना कलेची आवड निर्माण झाली. या आवडीमुळेच त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वभारती विद्यापीठ, शांतिनिकेतन येथे प्रवेश घेतला. तेथे त्यांनी चित्रकलेसह अन्य कलांचे शिक्षण घेतले. रे यांना रवींद्रनाथ टागोर यांचे मार्गदर्शन मिळाले.

रवींद्रनाथ टागोर यांना शालेय शिक्षणातील कडक चौकटी मान्य नव्हत्या. त्यांनी निसर्गाशी एकरूप शिक्षण, सृजनशीलता, स्वतंत्र विचार आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असे शिक्षण दिले. ते म्हणत : “Education must be based on the freedom of mind.” त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कला – चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक यांचा विकास होईल असे अभ्यासक्रम  तयार केला. त्यामुळे शांतिनिकेतन ही संस्था एक सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध झाली. टागोर यांचा प्रभाव रे यांच्यावर पडला. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. रे यांनाही ऑस्कर पुरस्कार मिळाला. जणू काही रे यांनी गुरु दक्षिणाच स्वत:ला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला.

सत्यजित रे यांचे वडील सुकुमार रे प्रसिद्ध बालकवी व लेखक होते.  वडिलांच्यातील साहित्यिक गुण सत्यजित रे यांच्यात उतरले होते. सत्यजीत रे ही प्रतिभावान लेखक होते. त्यांनी मुलांसाठी “फेलूदा” ही डिटेक्टिव्ह कथा मालिका लिहिली. तसेच त्यांनी “प्रोफेसर शोंकू” नावाचे विज्ञानकथांचे पात्रही निर्माण केले. त्यांच्या कथांमध्ये बुद्धिमत्ता, निरीक्षण शक्ती, गूढ यांचा संगम होता. त्यांनी भयकथा, रहस्यकथा, विनोदी कथा, बाल कथाही लिहिल्या. सहज, रोचक शैलीमुळे त्यांच्या बालकथा गाजल्या. रे यांचे बंगाली भाषेतील साहित्य आजही तितकेच लोकप्रिय आहे. ते स्वतःच स्वतःच्या चित्रपटांचे संगीत देत आणि पटकथा, संवाद लेखनही करत असत. ते उत्कृष्ट ग्राफिक डिझायनर होते – त्यांनी अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठ डिझाइन केले.

सत्यजित रे यांचा चित्रपटांकडे वळण्याचा प्रवास हा त्यांची साहित्यिक रुची, आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा प्रभाव, आणि एक सर्जनशील दृष्टी यांच्या संयोगातून घडलेला आहे. रे यांना लहानपणापासूनच बंगाली साहित्याची आवड होती. बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांचे “पथेर पांचाली” हे कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करण्याची त्यांची कल्पना होती. त्यांनी ही कथा वाचल्यावर तिच्यातील साधेपणा, ग्रामीण जीवन आणि मानवी भावनांची खोली याने त्यांना खूप प्रभावित केले.

1950 मध्ये रे लंडनला गेले असताना त्यांनी सुमारे शंभर हून अधिक चित्रपट पाहिले. यामध्ये त्यांनी इटालियन नव-यथार्थवादी चित्रपट Bicycle Thieves (1948) पाहिला, जो त्यांच्या दृष्टिकोनाला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटातील साधे कथानक, नैसर्गिक अभिनय आणि वास्तववादी शैलीने त्यांना प्रभावित केले.

सत्यजित रे हे कोलकात्यातील Calcutta Film Society चे सह-संस्थापक होते. या चळवळीने त्यांना जागतिक चित्रपटांची समज आणि रसिकतेचा अनुभव दिला.

रे यांनी स्वतःच्या डिझायनर नोकरीच्या बचतीतून “पथेर पांचाली” चे चित्रीकरण सुरू केले. आर्थिक अडचणींवर मात करत, अनेक वर्षे हा चित्रपट तयार करण्यात गेली. अखेरीस 1955 मध्ये “पथेर पांचाली” प्रदर्शित झाला आणि जागतिक स्तरावर खूप प्रतिष्ठा मिळवली.

रे यांचे चित्रपट मानवी जीवनातील गुंतागुंतीच्या भावना, जसे की प्रेम, दु:ख, आशा, पराभव, आणि स्वाभिमान यांचं संवेदनशील चित्रण करतात. उदा. पथेर पांचाली  या चित्रपटात एका गरीब कुटुंबाच्या जीवनातल्या संघर्षाचं वास्तववादी चित्रण केले आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये समाजातील आर्थिक विषमता, जातीय व्यवस्था, आणि शहरी-ग्रामीण यातील दरी यांचा उल्लेख असतो. जलसाघर हा चित्रपट १९५८ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात एका जमीनदाराच्या पतनाची कथा मांडली आहे, जी काळानुसार बदलत जाणाऱ्या समाजाची साक्ष देते. रे यांनी बदलत्या काळानुसार माणसाच्या जीवनशैलीत होणारे बदल टिपले आहेत. रे यांना बालकांच्या दृष्टिकोनातून कथा सांगणे फार आवडायचं.गोपी गायेन बाघा बायेन, हिरक राजार देशे, सोनार केला – फेलूदा व प्रोफेसर शोंकू यांच्याद्वारे विज्ञान, साहस व नैतिकता यांची सांगड घातली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये संवाद कमी, पण प्रभावी असतो. त्यांनी चित्रपटात दृश्य, संगीत आणि मौन यांच्या माध्यमातून भावनिक परिणाम साधला जातो. सत्यजित रे यांच्या चित्रपटांचा आशय हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो विचारप्रवर्तक, वास्तवदर्शी आणि कलात्मक असतो. त्यांनी भारतीय समाजाच्या विविध स्तरांना एका संवेदनशील नजरेने मांडलं आहे.

सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेले प्रमुख चित्रपट असे :   पराजितो (1956), अपूर संसार (1959), चारुलता, (1964), शतरंज के खिलाड़ी (1977) (हिंदी चित्रपट), नायक (1966), घरे बाहिरे (1984), आगंतुक (1991)

सत्यजित रे यांना मानाचे पुरस्कार मिळाले : भारतरत्न – १९९२, दादासाहेब फाळके पुरस्कार – १९८५, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – ३० हून अधिक वेळा, गोल्डन लायन (व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल), सिल्व्हर बिअर (बर्लिन फिल्म फेस्टिव्हल), बाफ्टा पुरस्कार.

———————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here