कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने RRB Technician Recruitment 2025 अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेमध्ये एकूण ६२३८ टेक्निशियन पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे.
रिक्त पदांचा तपशील :
-
टेक्निशियन ग्रेड-I (सिग्नल) : १८३ पदे
-
टेक्निशियन ग्रेड-III : ६०५५ पदे
अर्ज करण्याची महत्त्वाची माहिती :
-
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : २८ जून २०२५
-
अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ जुलै २०२५, रात्री ११.५९ वाजेपर्यंत
-
अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख : ३० जुलै २०२५
-
अर्जातील चूक सुधारण्याचा कालावधी : ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५






