मुंबई : प्रसारमाध्य वृत्तसेवा
भारतीय बाजारात सोन्याच्या दरांनी आज पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,००,१५० रुपये झाला असून, गेल्या काही दिवसांपासून ही वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये दर १,००,१८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत असून, सोन्याची खरेदी सामान्यांसाठी कठीण झाली आहे.
दरवाढीमागचे प्रमुख कारण
सोन्याच्या या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि व्यापारातील सततचे संकट ही मुख्य कारणं आहेत. अमेरिका ऑगस्टपासून काही उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क लागू करणार असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत. जून २०२५ मध्ये सोन्याच्या महागाई दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल ३० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार सोनं हे सर्वात जास्त महाग झालेल्या वस्तूंमध्ये समाविष्ट झालं आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील २४ कॅरेट सोन्याचे आजचे दर ( प्रति तोळा ) :
शहर | दर (₹) |
---|---|
मुंबई | ₹ १,००,१५० |
पुणे | ₹ १,१००,१५० |
नागपूर | ₹ १,१००,१५० |
नाशिक | ₹ १,१००,१८० |
छत्रपती संभाजीनगर | ₹ १,१००,१५० |
कोल्हापूर | ₹ १,१००,१६० |
सांगली | ₹ १,१००,१५५ |
सातारा | ₹ १,१००,१५० |
वाढलेल्या किमतींमुळे ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये अस्वस्थता आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सोन्याची पारंपरिक खरेदी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः लग्नसराईत सराफ बाजारात मागणी कमी झाल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत.
गुंतवणूक सल्लागारांच्या मते, सोन्याच्या दरात काही प्रमाणात स्थिरता आली तरीही जागतिक बाजारातील घडामोडींमुळे भविष्यात दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुज्ञपणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवूनच निर्णय घ्यावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.
——————————————————————————————–